औरंगाबाद : महापालिकेतील ७० परवानाधारक प्लंबर्सवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्लंबर्स असोसिएशनने मनपाला कोर्टामार्फत नोटीस बजावली आहे. असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप एस. बोर्डे, सरचिटणीस अब्दुल सलीम अब्दुल रहीम यांनी कोर्टात धाव घेतल्याचे कळविले आहे. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नवीन नळ कनेक्शन देण्यासाठी मनपाकडील परवानाधारक प्लंबर्सचा विचार केलेला नाही. त्यामुळे असोसिएशनने कोर्टात धाव घेतली आहे. नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्याचे धोरण जाहीर केले आहे. ३ हजार २५० रुपये नवीन नळासाठी दर मनपा सभेने मंजूर करून दिलेले आहेत. मात्र, कंपनीने १० हजार रुपयांहून अधिक रक्कम कनेक्शन घेण्यासाठी आकारण्याचे ठरविले आहे. ही रक्कम बेकायदेशीर असल्याचा आरोप प्लंबर्सने केला आहे. नळ कनेक्शन महागलेशिवसेना- भाजपाची सत्ता असलेल्या महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या योजनेचे खाजगीकरण करून समांतर जलवाहिनीचे कंत्राट कंपनीला दिले. त्या कंपनीने १० हजार रुपयांत नवीन नळ कनेक्शन मिळेल, असे दोन दिवसांपूर्वी जाहीर केले आहे, त्यासाठी प्लंबर्स काम करतील.
प्लंबर्सवर उपासमारीची वेळ
By admin | Updated: October 12, 2014 00:26 IST