राजेश खराडे ल, बीडकेज विधानसभा मतदार संघात भाजपाच्या उमेदवार संगीता ठोंबरे विजयी झाल्या आहेत. मात्र अंबाजोगाई शहर मतदारांनी रा.कॉ. च्या नमिता मुंदडा यांना कौल दिला आहे. जिल्ह्याच्या निवडणुकीत यंदा अमुलाग्र बदल झाला असून गतवेळी रा.कॉ पाच तर भाजपाला केवळ एक जागा मिळवण्यात यश आले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत हेच चित्र उलटार्थी झाले असून भाजपाला जिल्ह्यात पाच ठिकाणी तर रा.कॉ. ला केवळ एक ठिकाणी आपले नशीब आजमाविता आले आहे. अंबाजोगाईच्या मतदारांनी मात्र येथील रा.कॉ च्या स्थानिक उमेदवार नमिता मुंदडा यांना पसंती दर्शवली आहे. शहरातून भाजपाच्या संगीता ठोंबरे यांना १०,७९१ मते मिळाली आहेत. तर रा.कॉ च्या नमिता मुंदडा यांना सर्वाधिक १३९४९ ऐवढी मते मिळाली आहेत. केज मतदार संघातून भाजपाच्या संगीता ठोंबरे या विजयी झाल्या असल्या तरी अंबाजोगाई शहरातून राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजयी उमेदवारापेक्षा ३,१५८ एवढे मताधिक्य मिळाले आहे. शहरातून शिवसेनेच्या कल्पना नरहिरे या चौथ्या स्थानावर असून बहुजन समाज पार्टीचे अॅड. माणिक अडमाने हे पाचव्या स्थानावर आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यात फोल ठरलेला मनसे या पक्षाला अंबाजोगाई शहरातही मतदारांनी नाकारलेले आहे. तर इतर अपक्ष उमेदारांना दोन अंकी संख्याही पार करता आलेली नाही.केज शहरात भाजपाला पसंतीकेज व शहर परिसरात मतदारांनी भाजपाच्या संगीता ठोंबरे यांना पसंती दिली आहे. केज मतदारसंघात राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपा या दोन प्रमुख पक्षातच खरी लढत झाली आहे. मात्र मतमोजणीत सुरवातीपासून आघाडी घेतलेल्या संगीता ठोंबरे या विजयी झाल्या आहेत. केज शहरवासीयांनी भाजपाला पसंती दिली आहे. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस या दोन पक्षात घासून मतदान झाले असल्याचे दिसत आहे. भाजपा, रा.कॉ. आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष सोडता इतर पक्ष व अपक्षांचा सुफडा साफ झाला असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांना सर्वाधिक ३२१४ मते तर रा.कॉ. च्या नमीता मुंदडा यांना २४१६ व कॉग्रेसच्या अंजली घाडगे यांना १८६१ मतांचाच कौल केज शहरवासीयांनी दिलेला आहे. शिवसेनेच्या कल्पना नरहिरे यांच्या पदरी फक्त १५५ मते पडली आहेत. तर अपक्ष उमेदवारांना शहरवासीयींनी साफ नाकारले असल्याचे दिसत आहे.
अंबाजोगाई शहरात घड्याळाचीच टिकटिक
By admin | Updated: October 22, 2014 01:19 IST