शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: March 15, 2015 00:38 IST

माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठा धुमाकूळ घातला़ एक दोन नव्हे तब्बल सहा घरे फोडून आतील तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला़

माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री मोठा धुमाकूळ घातला़ एक दोन नव्हे तब्बल सहा घरे फोडून आतील तीन लाखाचा मुद्देमाल लंपास केला़ या घटनेने माणकेश्वरसह परिसरात खळबळ उडाली आहे़ मिळालेल्या माहितीनुसार, माणकेश्वर येथील यासीन महंमद मुखेर हे शुक्रवारी रात्री कुटुंबियांसह घरात झोपले होते़ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मुख्य दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला़ आतील कपाटाचे लॉक तोडून आतील दागिने, नेकलेस, अंगठ्या, कानातील झुबे, चांदीचे पैंजन, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला़ तर गावातीलच गणेश विलास अंधारे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ घरातील पँटीच्या खिशात ठेवलेले १२ हजार रूपये रो व सोन्याच्या दोन अंगठ्या, कनातील झुबे, मनी असा ५० ते ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ प्रदिप किरमे यांच्या घरातील दोन मोबाईल, पँन्टीच्या शिखातील ३००० रूपये असा ऐवज नेला़ सोमनाथ अंधारे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ मात्र, घरातील मंडळी जागी झाल्याने तेथून त्यांनी पळ काढला़ तसेच संदीप अंधारे, प्रकाश दनाने यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ एकाच रात्री तीन ठिकाणी हात साफ करून तीन ठिकाणी अयशस्वी प्रयत्न केला आहे़ या प्रकारामुळे माणकेश्वरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत चौकशीची प्रक्रिया सुरू होती़ (वार्ताहर)४ उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे एका महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावून पळून जाण्याच्या प्रयत्नातील चोरट्यास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले़ ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली असून, या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ मिळालेल्या माहितीनुसार, केसरजवळगा येथील एका वृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून एक चोरटा पळत होता़ त्याला गावातील विनायक क्षीरसागर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़