तुळजापूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या सासू, जाऊ यांना शिवीगाळ, मारहाण करीत विनयभंग केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास सरडेवाडी (ता़तुळजापूर) येथे घडली़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरडेवाडी येथील एक महिला तिची सासू व जाऊ यांच्यासोबत शनिवारी रात्रीच्या सुमारास गावातील एक कौटुंबिक कार्यक्रम करून घराकडे परतत होत्या़ त्या गावातील मारूती मंदिराजवळ आल्या असता गावातीलच ११ जणांनी त्या महिलेसह तिघींना निवडणुकीच्या कारणावरून अश्लील शेरेबाजी, शिवीगाळ करीत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पिडित महिलेने तुळजापूर पोलीस ठाण्यात दिली़ त्या महिलेचे फिर्यादीवरून ज्ञानेश्वर सरडे, शरद धुरगुडे, अमोल नन्नवरे, विलास सरडे, दिलीप नन्नवरे, रमेश नन्नवरे (सर्व रा़ सरडेवाडी), मकरंद डोंगरे, नितीन डोंगरे, विजय डोंगरे, अमोल डोंगरे, गिरीश डोंगरे (सर्व रा़मंगरूळ ता़तुळजापूर) या ११ जणांविरूद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ तपास पोउपनि भंडारी हे कारीत आहेत़
सरडेवाडीत तीन महिलांना मारहाण
By admin | Updated: August 17, 2015 01:04 IST