शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

अभियांत्रिकीच्या थेट दुसऱ्या वर्षासाठी तीन हजार प्रवेश क्षमता

By admin | Updated: July 15, 2016 01:06 IST

औरंगाबाद : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी औरंगाबाद शहरात सुमारे तीन हजार जागा असून, या जागांवर प्

औरंगाबाद : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमासाठी औरंगाबाद शहरात सुमारे तीन हजार जागा असून, या जागांवर प्रवेश देण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरू झाली. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १४ ते २३ जुलैपर्यंत आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीबरोबरच तंत्रशिक्षण विभागाने नेमून दिलेल्या सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी स्वत: जाऊन अर्ज निश्चिती करायची आहे. २६ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी २७ ते २९ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतिम गुणवत्ता यादी ३० जुलै रोजी जाहीर होईल. सर्व तंत्रनिकेतन पदविका केलेले विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेस पात्र असतील. मागास प्रवर्गासाठी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्के गुण आणि खुल्या वर्गासाठी ४५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा नवीन बदल स्वीकारण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने म्हणजे फ्लोट, स्लाईड आणि फ्रीज पद्धतीचा अवलंब थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी करण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतही अभियांत्रिकी प्रथम वर्षाप्रमाणेच तीनशे विकल्प देण्याची सुविधा असेल. तीन फेऱ्यांसाठी एकच विकल्प अर्ज भरायचा आहे. चौथ्या फेरीपूर्वी नव्याने विकल्प अर्ज भरण्याची सुविधादेखील असेल. राज्यात एकूण १८७ व मराठवाड्यात एकूण ३० सुविधा केंद्रे ठेवण्यात आली आहेत. राज्यात ३० हजारांहून अधिक तर औरंगाबादमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक प्रवेश क्षमता आहे.