शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वाळूघाट सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 00:47 IST

नांदेड : वाळू उत्खननाचा कोणताही लेखाजोखा न ठेवता अमाप वाळू उपसा सुरू असलेले देगलूर तालुक्यातील तीन वाळू घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़

अनुराग पोवळे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वाळू उत्खननाचा कोणताही लेखाजोखा न ठेवता अमाप वाळू उपसा सुरू असलेले देगलूर तालुक्यातील तीन वाळू घाट बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़ जिल्ह्यातील इतर वाळूघाटांवरही कमीअधिक प्रमाणात अशीच परिस्थिती आहे़ या सर्व घाटांच्या तपासणीचे आदेश जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत़देगलूर तालुक्यातील शेकापूर आणि सांगवी उमर येथील वाळू घाटांची मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी १२ मे रोजी संयुक्त पाहणी केली होती़ या पाहणीदरम्यान लिलावधारक ठेकेदाराने तपासणी अधिकाऱ्यांना कोणतेही सहकार्य न करता अभिलेखेही तपासणीसाठी सादर केले नाहीत़ या तपासणीत उत्खनन केलेल्या वाळूची, वाळू खरेदी करणाऱ्याची माहिती तसेच मासिक विवरणही सादर केले नाही़ या वाळूघाटांवर परवानगी दिलेल्या सीमा निश्चित करण्यासाठी उभारलेले खांबही ठेकेदाराने काढून दिवसरात्र वाळू उपसा सुरू ठेवला होता़ वाळू वाहतूक व विक्रीचे कोणतेही कागदपत्र तपासणीसाठी उपलब्ध करून न दिल्याने हे रेतीघाट तत्काळ बंद करण्याची गरज तपासणी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती़ हाच प्रकार २६ मे रोजी केलेल्या शेवाळा येथील वाळूघाटाबाबतही घडला़ येथील ठेकेदारानेही कोणतेही कागदपत्र तपासणी अधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले नाही़ सांगवी उमर आणि शेकापूर वाळूघाटावर परवानगीपेक्षा अधिक वाळूचे उत्खनन झाल्याने हे दोन्हीही वाळूघाट कायमस्वरूपी बंद करण्याची गरज असल्याची शिफारश देगलूरचे तहसीलदार माधव किरवले यांनी केली होती़ देगलूरचे तहसीलदार किरवले आणि मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी तपासणी अहवालातील शिफारशीनंतर जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी शेवाळा, सांगवी उमर आणि शेकापूर येथील वाळूघाटाची ईटीएस मशीनद्वारे मोजणी करून मोजणी अहवाल कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देगलूर तहसीलदारांना दिले आहेत़ हा अहवाल सादर होईपर्यंत शेवाळा वाळूघाट बंद करण्याचे आदेशीत केले आहे़ तीन वाळूघाटांच्या लिलावातून जवळपास ३ कोटींचा महसूल मिळाला होता़