शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अपहार प्रकरणी संस्थाचालकासह तिघांवर गुन्हा

By admin | Updated: June 23, 2014 00:25 IST

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात अपहारप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

नळदुर्ग : येथील उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शालेय पोषण आहारात एक लाख, १४ हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी संस्थाध्यक्षासह सचिव, मुख्याध्यापिकेविरूध्द न्यायालयाच्या आदेशावरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, संस्थाचालकाविरूध्द अपहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे़पोलिसांनी सांगितले की, तुळजापूर येथील अमर परमेश्वर-कदम यांनी तुळजापूर न्यायालयात अपहार प्रकरणी तक्रार दिली होती़ नळदुर्ग येथील सय्यद अब्दुल्ला शहा मेमोरीअल उर्दू शाळेचे अध्यक्ष सय्यद तनवीरअली खतीब, सचिव जावेद वलीउल्ला काझी, मुख्यध्यापिका महेबुबी अ-रजाक शेख यांनी संगणमत करून शालेय पोषण आहारात १६ सप्टेंबर ते १९ आॅक्टोबर २०१३ व २१ आॅक्टोबर २०१३ या कालावधीत इंधन, भाजीपाला खर्चापोटी जवळपास एक लाख, १४ हजार रूपयांचा बनावट खर्च दाखवून अपहार करीत शासनाची फसवणूक केली़ तुळजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधीक्षक एस़आरग़ुरव, विस्तार अधिकारी गंगाधर सर्जे, केंद्रप्रमुख एम़एस़भोरे यांची नियुक्ती केली होती़ या पथकाने १३ सप्टेंबर रोजी शाळेस भेट देवून पंचनामा करून अहवाल दाखल केला होता़ पंचनाम्यादरम्यान पाच वर्गखोल्यात १ लाख, ६ हजार ३९४ रूपयांचा ७८ क्विंटल ५० किलो तांदळाचा अनाधिकृत साठा आढळून आला होता़ मिळालेल्या साठ्यातल १५ क्विंटल तांदळाची नासाडी झाली होती़ तर ३७ पॉकेट गोडेतेल कालबाह्य झाले होते़ असे असतानाही मुख्याध्यापिकेने तांदूळ संपल्याचा अहवाल वरिष्ठांना देत तांदळाची मागणी केली होती़ तांदूळ शिल्लक असतानाही ते शिजविण्यासाठीची मजुरी, भाजीपाला व इंधनाच्या खर्चाची मागणीही प्रशासनाकडे करून खर्ची टाकली होती़ याप्रकरणी सर्वस्तरातून कारवाईची मागणी होत असताना प्रशासनाने मात्र सोईस्करपणे भिजतघोंगडे ठेवले होते़ याबाबत कदम यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर न्यायालयाने ९ महिन्यानंतर संस्थाध्यक्ष, सचिवासह मुख्याध्यापिकेविरूध्द गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले़ न्यायालयाच्या आदेशावरून वरील तिघाविरूध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सदरील प्रकरणाचा अधिक तपास सपोनि एम़वाय़डांगे हे करीत आहेत़ (वार्ताहर)हे प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासनाकडून अद्याप कारवाई न करता भिजत घोंगडे कायम ठेवले आहे़ संस्थेने मुख्याध्यापिकेस यापूर्वीच निलंबित केले आहे़ तांदळाचा साठा शिल्लक असताना पुन्हा पुरवठा का केला, चौकशीत तांदूळ शिल्लक असल्याचे निष्पन्न झाले असतानाही मजुरी, भाजीपाला व इंधनापोटी खर्ची केलेली रक्कम वसूल का केली नाही, अधिकाऱ्यांनी वारंवार भेटी दिल्यानंतरही तांदूळ शिल्लक कसा राहिला यासह इतर अनेक प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.