शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

उजळून देण्याच्या नावाखाली तीन तोळ्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:44 IST

सोन्याचे दागिने उजळून देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी सासू-सुनाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स, असा सुमारे तीन तोळ्याचा ऐवज लंपास केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोन्याचे दागिने उजळून देण्याचे आमिष दाखवून दोन अनोळखी भामट्यांनी सासू-सुनाच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स, असा सुमारे तीन तोळ्याचा ऐवज लंपास केला. ही घटना पहाडसिंगपुरा येथे ११ आॅक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.पोलिसांनी सांगितले की, पहाडसिंगपुरा येथील रहिवासी कमलाबाई सुंदरलाल कणसे (५५) आणि त्यांची सून रेखा कणसे या गुरुवारी दुपारी घरी होत्या. त्यांनी त्यांच्या अंगणात पितळी आणि तांब्याची भांडी ठेवली होती. यावेळी २८ ते ३० वयाचे दोन अनोळखी तरुण तेथे आले आणि अत्यल्प दरात भांडी आणि दागिने उजळून देतो, असे ते म्हणाले. सुरुवातीला त्यांनी घरासमोरील तांबे-पितळी धातूची भांडी उजळून दाखविली. यावेळी लहान मुलींच्या हातातील चांदीचे कडे आणि पायातील चांदीची चैन त्यांनी उजळून दाखवून सासू-सुनांचा विश्वास संपादन केला. यावेळी त्यांनी तुमच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्सही मळाल्याने काळे पडल्याचे म्हणाले. हे दागिने पंधरा मिनिटांत नवे कोरे करून देतो, असे ते म्हणाले. आरोपी अत्यंत गोड बोलत असल्याने त्यांनी गळ्यातील सोन्याचे दोन डोरले असलेले सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील टॉप्स आरोपींकडे काढून दिले. यावेळी त्यांनी स्वयंपाक घरातील एका पातेल्यात पाणी आणि पावडर टाकली आणि त्यात हे दागिने टाकले. हे पाणी गरम होत असतानाच आरोपींनी त्यात काहीतरी लिक्विड टाकल्याने धूर निर्माण झाला. यावेळी पंधरा मिनिटांनंतर पातेल्याचे झाकण उघडा असे ते म्हणाले.