उमरगा : जमीन खरेदीचा व्यवहार करण्यासाठी एका माजी सैनिकाने बँकेतून काढून डिक्कीत ठेवलेले २ लाख ८४ हजार रूपये चोरट्यांनी हातोहात लंपास केले़ ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी उमरगा शहरात घडली असून, या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेठसांगवी येथील माजी सैनिक विलास मारूती घोडके (ह़मु़एस़टीक़ॉलनी, उमरगा) यांनी काही दिवसांपूर्वी कोंडजीगड येथील शेतजमीन विकली असून, त्याचे पैसे येथील भारतीय स्टेट बँकेत ठेवे होते़ त्यानंतर त्यांनी पेठसांगवी शिवारातील महादेव यल्लाप्पा माकरे यांच्या शेतजमीनिचा सौदा केला होता़ या जमिनीचे शनिवारी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत होणार होते़ मात्र, शनिवारी बँक लवकर बंद होणार असल्याने विलास घोडके हे सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गेले़ बँकेतन दोन लाख, ८४ हजार रूपये काढून ते बाहेर आले़ बाहेर थांबलेले मित्र बंडू नरसिंग जांभळे यांच्या दुचाकीच्या (क्ऱएम़एच़२५- ए़ ६४६१) डिक्कीत बँकेतून काढलेले पैसे ठेवले व दुसरा मित्र राजेंद्र माळी याच्या दुचाकीवर बसून ते तेथून निघाले़ काही अंतरावर गेल्यानंतर समोरील दुचाकीची डिक्की उघडी दिसली़ त्यामुळे दोन्ही दुचाकी थांबवून डिक्कीत पाहणी केली असता चोरट्यांनी पैसे लंपास केल्याचे समोर आले़ या प्रकरणी विलास घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि विलास गोबाडे हे करीत आहेत़ (वार्ताहर)
दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख लंपास
By admin | Updated: September 21, 2014 00:25 IST