बीड : जिल्ह्यात मागील २४ तासात चार ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे ठार झाले तर चार जखमी आहेत. गेवराई, बीड, अंबाजोगाई आणि आष्टी तालुक्यात या घटना घडल्या.गेवराई तालुक्यातील किनगावजवळ शुक्रवारी रात्री ११ वाजता जीप उलटून झालेल्या अपघातात सुखदेव रामभाऊ चिकणे (वय ६० रा. गंगावाडी हमु गेवराई) या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. ते स्वत:च्या जीपमधून (एमएच १३ -३६५६) मधून पुतण्या विशाल भीमराव चिकणे याच्यासोबत गंगावाडीहून गेवराईकडे परतत होते. सुखदेव हे स्वत: जीप चालवत होते. त्यांची जीप किनगावजवळ उलटली. परिसरातील नागरिकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशाल जखमी आहे. पोहेकॉ एस. व्ही. घाणे करत आहेत.आष्टी तालुक्यात दोन जखमीतालुक्यातील आंधळेवाडी फाट्यावर जीप (एमएच २३ डब्ल्यू १९७१) ने जामखेडहून आष्टीकडे येणाऱ्या दुचाकी (एमएच १४ एफके १७४८) ला शनिवारी सायंकाळी सात वाजता धडक दिली. दत्तात्रय शिंदे, परमेश्वर जाधव (दोघेही रा. आष्टा, जि. नांदेड) हे जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुचाकी घसरून एक ठारअंबाजोगाई तालुक्यातील पोखरी येथे दुचाकी घसरून जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शनिवारी सकाळी हा अपघात झाला. जगन्नाथ संपती मस्के (३०, रा. पोखरी, ता. अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. दुचाकी (एमएच २५/३१८३) वरून तो अंबाजोगाईहून पोखरीकडे जात होता. गावालगत त्याची दुचाकी घसरली. स्वारातीत उपचारादरम्यान त्याने शेवटचा श्वास घेतला. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात नोंद केली आहे. (प्रतिनिधी)बीड तालुक्यातील रौळसगाव येथे दुचाकी (एमएच २३ यू ७९७६) ला सोलापूर - औरंगाबाद बस (एमएच १४ बीटी ३३२०) ने शनिवारी सायंकाळी सहा वाजता जोराची धडक दिली. यामध्ये कैलास जनकराव पाटील (२६, रा. देवीबाभूळगाव, ता. बीड) हा जागीच ठार झाला. अन्य एक जखमी आहे. बसचालकाने पोबारा केला. महामार्ग विभागाचे फौजदार सुधीर इंगे घटनास्थळी पोहचले.
चार अपघातांत तीन ठार; चार जखमी
By admin | Updated: March 27, 2016 00:02 IST