शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

औरंगाबादमध्ये बेशिस्त वाहनचालकांकडून वर्षभरात तीन कोटींचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 19:18 IST

वर्षभरात तब्बल ९७ हजार वाहनचालकांना नियम मोडताना पकडले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्तालयाची हद्दतब्बल ९७ हजार वाहनधारकांवर कारवाई

औरंगाबाद : वाहतूक  नियमन करता करता शहर पोलिसांनी वर्षभरात तब्बल ९७ हजार वाहनचालकांना नियम मोडताना पकडले. या चालकांकडून ३ कोटी २४ लाख ६७ हजार ४७२ रुपये दंड वसूल करण्यात आला.

पोलीस आयुक्तालय हद्दीतील वाहतूक नियमन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत आहे. या वाहतूक विभागांतर्गत शहर शाखा एक आणि शाखा दोन सोबतच, सिडको, छावणी आणि वाळूज, अशा एकूण पाच शाखेत ३५० पोलीस कार्यरत आहे.  वाहतूक नियम मोडून वाहने चालविणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत शहर पोलिसांनी नियम मोडणाऱ्या ९७ हजार ४७२ बेशिस्त वाहनचालकांना पकडले.

परवान्याचे उल्लंघन करणे, राँग पार्किंग करणे, स्टॅण्ड सोडून वाहन उभे करणे, रिक्षात चालकाशेजारी प्रवासी बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून वाहने चालविणे. विनासीटबेल्ट कार चालविणे, ट्रीपल सीट दुचाकी पळविणे, विनालायसन्स वाहन चालविणे, विनानोंदणी वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनांत बदल करणे, फिटनेस प्रमाणपत्र नसलेले वाहन चालविणे, वाहनांवर फॅन्सी आणि अस्पष्ट नंबर टाकणे, विनागणवेश टॅक्सी चालविणे, यासह मोटार वाहन कायदा आणि मुंबई पोलीस कायद्याच्या विविध कलमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. 

‘नो एंट्री’त पकडले सर्वाधिक वाहनचालकजड वाहनांना शहरात प्रवेश मनाई आहे. याशिवाय बायपासवरील अपघात टाळण्यासाठी सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.या नियमांचे उल्लंघन करताना सर्वाधिक २९ हजार ७५५ वाहनचालकांना  पकडण्यात आले. या वाहनचालकांकडून ६६ लाख ६१ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला. भरधाव वेगाने वाहने पळविणाऱ्या १७५ वाहनचालकांना पोलिसांनी पकडले. 

अकराशे मद्यपी वाहनचालकांवर  कारवाईदारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो, ही बाब लक्षात घेऊन वर्षभरात अकराशे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एच. एस. भापकर यांनी दिली. ते म्हणाले की, मद्यपी वाहनचालकांकडून २५ लाख २९ हजार ९०० रुपये दंड भरून घेण्यात आला.

४ हजार ८३४ दुचाकीस्वारांना पकडले विनाहेल्मेट४ हजार ८३४ जणांना विनाहेल्मेट दुचाकी चालविताना तर ९ हजार ४६१ जणांना सीटबेल्टविना कार चालविताना पकडून दंड वसूल केला.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीfundsनिधीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस