शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना जन्‍मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST

औरंगाबाद : खुल्या भूखंडाच्या वादातून अमोल अशोक दांगडे (३०) याचा खून केल्याच्या आरोपाखाली शेख मोहम्मद अहेमद, शेख मोहम्मद इमरान ...

औरंगाबाद : खुल्या भूखंडाच्या वादातून अमोल अशोक दांगडे (३०) याचा खून केल्याच्या आरोपाखाली शेख मोहम्मद अहेमद, शेख मोहम्मद इमरान शेख मो. उमर आणि शेख मोहम्मद इसाक याला विशेष सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी सोमवारी जन्‍मठेप व प्रत्‍येकी १० हजार रुपये दंड, तसेच चौथा आरोपी मोहम्मद फारुक शेख मो. उमर याला २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.

या संदर्भात इंदुबाई अशोक दांडगे (५५, डोंगरगाव ता.सिल्लोड) यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्‍या घराच्‍या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावरून त्यांचा आणि वरील आरोपींचा वाद सुरू होता. याबाबतचा वाद सिल्लोडच्‍या दिवाणी न्‍यायालयात प्रलंबित आहे. या भूखंडावरून त्‍यांच्‍यात नेहमी वाद होत असे. १४ ऑगस्‍ट, २०१६ रोजी दुपारी सदर भूखंडावर वरील आरोपी बांधकाम क‍रीत होते. त्‍यावेळी फिर्यादीची मुलगी वैशाली तेथे आली, तिने बांधकामाला विरोध करीत त्‍याची मोबाइलमध्‍ये शूटिंग केली. त्‍यामुळे चिडलेल्या आरोपींनी तिचे केस पकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. त्‍याच वेळी अमोल अशोक दांगडे (३०) हा देखील तेथे आला. आरोपींनी त्‍यालाही शिवीगाळ व मारहाण केली. आरोपी इसाक व इम्रान या दोघांनी अमोलचे हात पकडले, तर अहेमद याने त्‍याच्‍या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. जखमी अमोलला उपचारासाठी घाटी रुग्णालयात आणले असता, त्‍याला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्‍यात आरोपींविरोधात खून आणि ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष सहायक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्‍यात प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदार वैशाली आणि फिर्यादी, तसेच वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. सुनावणीअंती न्यायालयाने वरील तिघा आरोपींना खुनाच्या आरोपाखाली भादंवि कलम ३०२ अन्‍वये आणि चौथा आरोपी शेख मोहम्मद फारुक याला गंभीर मारहाण केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ३२४ अन्‍वये वरीलप्रमाणे शिक्षा आणि दंड ठोठावला. ॲड.बांगर यांना ॲड.रमेश ढाकणे यांनी सहकार्य केले. पैरवी म्हणून सहायक फौजदार जे.आर. पठाण यांनी काम पाहिले.

चौकट

आरोपींना यापूर्वीही झाली शिक्षा

गुन्‍हा घडण्‍यापूर्वी ३० फेब्रुवारी, २०१६ मध्‍ये याच भूखंडाच्या वादावरून वरील सर्व आरोपींनी फिर्यादी इंदुबाई अशोक दांडगे हिला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल झाला होता. या गुन्‍ह्यात तत्कालीन सत्र न्‍यायाधीश डी.एस. शिंदे यांनी वरील सर्व आरोपींना दोषी ठरवून १३ डिसेंबर, २०१८ रोजी शिक्षा ठोठावली होती.