शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हजार विहिरी रखडल्या !

By admin | Updated: November 19, 2015 00:24 IST

सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून,

सितम सोनवणे , लातूरजिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत सात वर्षांत पाच हजार सिंचन विहिरींना मंजुरी मिळाली. त्यापैकी ३ हजार ६१२ विहिरी पूर्ण झाल्या असून, सध्याला तब्बल २ हजार २१५ सिंचन विहिरींची कामे अपूर्ण आहेत. नव्हे, या विहिरी रखडल्या आहेत. या विहिरी झाल्या असत्या तर टंचाईच्या काळात मदत झाली असती.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यात २००८ पासून विविध कामे सुरु करण्यात आली़ यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहीर, रस्ता आदी कामे सुरु करण्यात आली होती़ मागील ७ वर्षांत लातूर जिल्ह्यात ५ हजार ८२७ सिंचन विहीर खोदकामास परवानगी देण्यात आली़ यातील केवळ ३ हजार ६१२ विहिरींचे काम पूर्ण झाले आहेत़ तर २२१५ विहिरींचे कामे अद्यापही अपूर्णच आहेत़ या अपूर्ण कामामध्ये अहमदपूर तालुक्यात ५४४ विहिरींची कामे सुरु केले होते़ त्यापैकी ३१४ विहिरी पूर्ण झाल्या़ तर २०३ विहिरी अपूर्ण आहेत़ औसा तालुक्यात ५०७ पूर्ण तर ४०५ अपूर्ण, चाकूर - २६० पूर्ण तर २५८ अपूर्ण, देवणी १८२ पूर्ण तर ४९० अपूर्ण, जळकोट २८१ पूर्ण तर ११६ अपूर्ण, लातूर ३८७ पूर्ण तर १५६ अपूर्ण, निलंगा ४५० पूर्ण तर १९० अपूर्ण, रेणापूर ३४४ पूर्ण तर ६६ अपूर्ण, शिरुर अनंतपाळ १५१ पूर्ण तर १५४ अपूर्ण, उदगीर ७०९ पूर्ण तर १७७ अपूर्ण आहेत़ अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण झाल्यास पाणीटंचाईची तीव्रता कमी होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची व्यवस्था होईल़