शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

पैठणच्या उद्यानातील वृक्षतोडीने हजारो पक्षी बेघर

By admin | Updated: February 3, 2015 01:01 IST

पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यान व परिसरात झालेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उद्यान प्रशासनाने याबाबत तातडीने गुन्हा दाखल केला.

पैठण : संत ज्ञानेश्वर उद्यान व परिसरात झालेल्या अवैध वृक्षतोडीबाबत उद्यान प्रशासनाने याबाबत तातडीने गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ कृषी चिकित्सालय फळ रोपवाटिका कृषी विभागाने वृक्षतोडीबाबत पैठण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या अवैध वृक्षतोडीमुळे हजारो पक्षी बेघर झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. हजारो वृक्षांची कत्तल झाल्यानंतरही पैठण वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केलेली नाही.पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यान व परिसरातील टेकड्यांवर राज्य शासनाने परिसर विकास पथक असा स्वतंत्र विभाग निर्माण करून या परिसरात जवळपास दीड लाख वृक्ष लावून ते जगवून मोठे केले होते. यामुळे या परिसराला घनदाट वनराईचे स्वरूप बहाल झाले होते. अलीकडच्या काळात लाकूड तस्करांनी या भागात बेसुमार वृक्षतोड करून हा भाग उजाड रानात परावर्तित केला आहे. कृषी विभागाने दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या परिसरातून आंबा मातृ वृक्ष ६५ यासह पेरूचे मातृ वृक्ष ५०, जांभूळ झाडे व लिंबाची झाडे तोडून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे.संत ज्ञानेश्वर उद्यानात वन खात्याच्या वन्यजीव विभागासाठी २५ एकर जागा देण्यात आलेली आहे. ही जागा त्यांच्या ताब्यात असून, येथे रक्षणासाठी एक वनरक्षक तैनात करण्यात आला आहे. असे असतानाही त्यांच्या भागातून शेकडो झाडे तोडण्यात आलेली आहेत. झाडे तोडल्यानंतर तहसीलदार संजय पवार यांनी या विभागाचे वनरक्षक चक्रे यांना बोलावून झालेली वृक्षतोड दाखविली. याबाबत तातडीने पंचनामा करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. एवढे होऊनसुद्धा वनखात्याने कारवाई केलेली नाही.