शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुक्यात विजेअभावी हजारो एकर ऊस सुकला

By admin | Updated: June 13, 2014 00:32 IST

माजलगाव: तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली.

माजलगाव: तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली. लावण्यात आलेला ऊस मात्र वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने जळून चालला आहे. वीज वितरणच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.माजलगाव तालुक्यात माजलगाव सहकारी साखर कारखाना व जय महेश कारखाना हे दोन साखर कारखाने असून, सावरगाव येथे छत्रपती कारखाना देखील या हंगामामध्ये उसाचे गाळप करणार असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली. शेतकऱ्यांकडे असणाऱ्या विहिरी, कूपनलिका यांची पाणीपातळी शेतीला पाणीपुरवठा करण्याजोगी असतानाही विजेअभावी शेतातील विद्युत पंप, विंधन विहिरी बंद आहेत. वीजपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमधून महावितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील हजारो एकरवरील ऊस पाणी असूनही विजेअभावी जळून जात आहे.अगोदरच मागील महिन्यात झालेल्या गारपिटीत व वादळी वाऱ्यात उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीतून शेतकरी कसाबसा सावरला होता. मात्र आता वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून जात आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)मागील दोन ते तीन महिन्यांपासून येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील सहायक अभियंता पद रिक्त आहे, त्यामुळे अडचणी सोडविण्यासाठी अद्यापही सक्षम अधिकारी मिळालेला नाही.