शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकांकडून अतिरिक्त वेतनाची होणार वसुली

By admin | Updated: December 29, 2016 22:53 IST

बीड : जि.प. शिक्षण विभागामार्फत दर्जावाढ दिलेल्या शिक्षकांची नियमबाह्यपणे सरसकट वरिष्ठ वेतन निश्चिती करण्यात आली होती.

बीड : जि.प. शिक्षण विभागामार्फत दर्जावाढ दिलेल्या शिक्षकांची नियमबाह्यपणे सरसकट वरिष्ठ वेतन निश्चिती करण्यात आली होती. यामुळे शासनाला जास्तीच्या वेतनापोटी प्रतिमाह ३० लाख रूपये इतका तर गेल्या दोन वर्षात एकूण साडेसात कोटींचा भुर्दंड पडल्याचे समोर आले होते. जास्तीच्या वेतनाची वसुली करण्याचे निर्देश शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांनी गुरूवारी दिले आहेत. एकूण शिक्षकांच्या २५ टक्के याप्रमाणे जवळपास दीड हजार शिक्षकांना त्यावेळी दर्जावाढ देण्यात आली. सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून दर्जावाढ दिली गेल्याने रिक्त झालेल्या सहशिक्षकांच्या जागांवर पुन्हा आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना सामावून घेण्यात आले. या बेकायदेशीर प्रक्रियेनंतर दर्जावाढ मिळालेल्या शिक्षकांनी वरिष्ठ वेतनश्रेणीची वेतन निश्चिती करुन घेतली. वास्तविक दर्जावाढ म्हणजे सहशिक्षकांना प्राथमिक पदवीधर म्हणून केवळ नियुक्ती मिळते; मात्र त्यामध्ये वाढीव वेतनश्रेणी देता येत नसतानाही वाढीव वेतनश्रेणी देण्याचा गंभीर प्रकार बिनबोभाट झाला. परिणामी गेल्या अडीच वर्षांपासून दर्जावाढ मिळालेले शिक्षक जास्तीचे वेतन उचलत आहेत. त्यामुळे शासनाला प्रतिमाह ३० लाखांचा आर्थिक भार सहन करावा लागत असून आतापर्यंत तब्बल साडेसात कोटी रुपयांचा भुर्दंड पडला आहे. हा प्रकार शासनाच्या लक्षात आल्याने चुकीच्या पद्धतीने दिलेल्या दर्जावाढ रद्द करण्याचे आणि त्याद्वारे लाटलेले जास्तीचे वेतन वसूल करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने पूर्वी दिलेली दर्जावाढ प्रक्रि या रद्द करण्याची कारवाई सुरु केली असून, अपात्र शिक्षकांची त्यांच्या विषयानुसार यादी बनविण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)