शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शाळांना चपराक

By admin | Updated: June 25, 2016 00:41 IST

औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

औरंगाबाद : नैसर्गिक वाढीनुसार वरचे वर्ग सुरू करताना २ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील अटींकडे काही शाळांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक तसेच शिक्षण संचालक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत. यापुढे जिल्हा परिषदांच्या शाळा तसेच कोणत्याही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करताना शासन निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, याकडे प्रभारी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांनी एका परिपत्रकाद्वारे लक्ष वेधले आहे. अनेक जि. प. तसेच काही खाजगी (विविध माध्यमांच्या) शाळांनी शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करून सरसकट इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरू करीत आहेत. यासंबंधीची तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल आणि विनाअनुदानित शाळा कृती समितीने प्रभारी शिक्षण उपसंचालक तुपे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन तुपे यांनी विभागातील सर्व जि. प. तसेच खाजगी शाळांसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे एक परिपत्रक जारी केले. परिपत्रकात नमूद केले आहे की, ज्या ठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे, पण त्या शाळेपासून १ किलोमीटरच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा इयत्ता ५ वीचा वर्ग नसेल, तर अशा शाळांनी ५ वीचा वर्ग सुरू करावा. मात्र, ज्याठिकाणी इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत शाळा आहे. याशिवाय शाळेपासून १ किलोमीटर परिघामध्ये दुसऱ्या शाळेत इयत्ता ५ वीचा वर्गदेखील सुरू आहे. अशा शाळांमध्ये ५ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. याप्रमाणे ज्या शाळेमध्ये १ ली ते ७ वीपर्यंतचे वर्ग आहेत; पण शाळेपासून ३ किलोमीटर अंतराच्या परिघामध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग नाही. अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येईल. मात्र, अशा शाळांच्या ३ किलोमीटर अंतराच्या परिघात अन्य शाळांमध्ये त्याच माध्यमाचा ८ वीचा वर्ग सुरू असेल, तर अशा शाळेत ८ वीचा वर्ग सुरू करता येणार नाही. शासन निर्णयातील अटी व शर्र्तींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांविरुद्ध कारवाई केली जाईल, असेही परिपत्रकाद्वारे सर्व शाळांना सूचित करण्यात आले आहे.