शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पोलिसांवरील कारवाईस चालढकल!

By admin | Updated: May 4, 2016 00:07 IST

बीड : कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एरवी तडकाफडकी कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने दोन गंभीर प्रकरणांत मात्र वेळकाढू भूमिका घेतली आहे.

नोटिसांचा फार्स: अंमळनेरमधील आरोपीचे पलायन; माजलगावात निरीक्षकांनी शर्ट काढल्याचे प्रकरणबीड : कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर एरवी तडकाफडकी कारवाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाने दोन गंभीर प्रकरणांत मात्र वेळकाढू भूमिका घेतली आहे. अंमळनेर (ता. पाटोदा) येथील पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून आरोपीने पलायन केले होते तर माजलगाव शहर ठाण्याच्या निरीक्षकांनी शर्ट काढून धिंगाणा घातल्याच्या प्रकरणांत सात दिवसानंतरही कारवाई केली नाही. केवळ नोटिसांचा फार्स करण्यात आला आहे.लहू मोहन मोरे (रा. कापसी ता. आष्टी) याला विद्युतपंप चोरी प्रकरणात अंमळनेर पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी रात्री शेतात लपवून ठेवलेला विद्युतपंप शोधण्यासाठी त्याला कोठडीबाहेर काढले होते. अंमळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक संतोष बुधावंत, सहायक फौजदार अरुण दाणी, पोहेकॉ बाळासाहेब सिरसाट, भागवत शिंदे यांना गुंगारा देऊन मोर पळाला आहे. तो अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही.याप्रकरणी उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी त्याच दिवशी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना अहवाल पाठविला होता; परंतु संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना केवळ कारणे दाखवा नोटीस पाठवून सोपस्कार केला आहे. माजलगाव प्रकरणातही वेळकाढू भूमिकामाजलगाव येथे २७ एप्रिल रोजी शहर ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत हरगबाळ यांनी शर्ट काढले होते. यावेळी त्यांचा कर्मचाऱ्यांसोबत वादही झाला होता. या प्रकरणात अंबाजोगाईचे अप्पर अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, सहायक निरीक्षक डॉ. एन. हरि बालाजी यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून हरगबाळ यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदविले होते. शर्ट काढल्याच्या या प्रकरणाने पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचला. याची सर्वत्र चर्चा झाली. मात्र, अधीक्षक पारसकर यांनी गरमीमुळे हरगबाळ यांनी शर्ट काढल्याचे सांगून सावरासावर केली. (प्रतिनिधी)...या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यातअंमळनेर पोलिसांनी लहू मोरे या आरोपीला रात्री आठ वाजता अंधारात विद्युतपंप जप्त करण्यासाठी कोठडीबाहेर कसे काय काढले?तो कोठडीत होता, तर दिवसाची सुरक्षित वेळ का निवडली नाही?माजलगाव शहर ठाण्याच्या निरीक्षकाच्या शर्ट काढल्याच्या प्रकरणात ‘फुल्ल टू’ चर्चा झाली, मग वैद्यकीय तपासणी का केली नाही.दोन्ही प्रकरणे गंभीर असताना कारवाईस विलंब का?अंमळनेर येथील आरोपी पलायन प्रकरणात संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना शो- कॉज नोटीस दिली आहे. माजलगाव प्रकरणातही कारवाई प्रस्तावित केली आहे.- अनिल पारसकर, पोलीस अधीक्षक़