शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ठोंबरे, पवार, देशमुख यांना आमदारकीची लागली ‘लॉटरी’

By admin | Updated: October 20, 2014 00:33 IST

व्यंकटेश वैष्णव ,बीड विधानसभा निवडणुकीत बीड सोडता इतर पाच विधानसभा मतदार संघात भाजपने बाजी मारली़ पाच पैकी तीन नविन उमेदवारांना आमदारकीची संधी मिळाली आहे़ ए

व्यंकटेश वैष्णव ,बीडविधानसभा निवडणुकीत बीड सोडता इतर पाच विधानसभा मतदार संघात भाजपने बाजी मारली़ पाच पैकी तीन नविन उमेदवारांना आमदारकीची संधी मिळाली आहे़ एकूनच तिघांच्या गळ्यात जनतेने पहिल्यांदाच आमदारकीची माळ घातली आहे़बीड विधानसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघापैकी बीड विधानसभा मतदार संघातच राष्ट्रवादी कॉंग्रेसला जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून विजय मिळविता आला़ इतर गेवराई, केज व माजलगाव, परळी,आष्टी मतदार संघात भाजपाने विजय मिळविला़ यामध्ये परळीच्या विजयी उमेदवार पंकजा मुंडे व आष्टीचे भीमराव धोंडे सोडता केजच्या संगिता ठोंबरे, गेवराईचे अ‍ॅड़ लक्ष्मण पवार व माजलगावचे आऱ टी़ देशमुख हे पहिल्यांदाच आमदार झाले आहे़ ही संधी त्यांना यावेळी जनतेने दिली आहे़ राज्यात कुठल्याच पक्षाला बहुमत नसले तरी भाजप-शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात असे संकेत आहेत़ बीड जिल्हयात तीन भाजपचे उमेदवार पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत़ तर परळीच्या आ़ पंकजा मुंडे व आष्टीचे आ़ भिमराव धोंडे हे अनुभवी आहेत़ पंकजा मुंडे यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे तर धोंडे हे यापुर्वी पंधरा वर्ष आमदार राहिलेले आहे़ आत मंत्रीमंडळात बीड पहिल्यांदाच आमदार झालेल्यांना संधी दिली जाते की, अनुभवी असलेले पंकजा मुंडे व धोंडे यांना संधी मिळते़ हे पहाणे औचुक्याचे ठरणार आहे़ गेवराईचे भाजप चे आ़ अ‍ॅड़ लक्ष्मण पवार हे पहिल्यांदाच आमदार झालेले असले तरी पवार यांचे मताधिक्य पंकजा मुंडे यांच्या दुप्पट म्हणजेच ६० हजार १ मताने विजयी झालेले आहेत़ पवार यांचे मताधिक्य इतर उमेदवारांच्या तुलनेत महत्वाचे आहे़ त्यामुळे त्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळते का ते पहावे लागणार आहे़केजच्या भाजप उमेदवार अनुसुचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत़ याशिवाय राकॉचे माजी आ़ पृथ्वीराज साठे सोडता १९९९ पासून केजच्या आमदाराकडे कायम मंत्रीपद राहिलेले आहे़ यावेळी केजमध्ये भाजपचा उमेदवार आहे़ विशेष म्हणजे राज्यात देखील भाजप-युतीचे सरकार स्थापन होऊ शकते़ यामुळे केजच्या भाजप आ़ संगिता ठोंबरे पहिल्यांदाच आमदार झालेल्या असल्या तरी त्यांना मंत्री मंडळात स्थान मिळू शकते़ तसेच मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असलेल्या पंकजा मुंडे यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली तरी त्यांच्यावर कॅबिनेट मधील एखाद्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी येऊ शकते़