शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

तिसºया दिवशीही सचखंड रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:12 IST

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांच्या अनुयायामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे सलग तिसºया दिवशीही म्हणजे सोमवारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि नांदेड-श्रीगंगानगर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे पंजाबला जाणारे प्रवासी नांदेडात अडकून पडले असून रेल्वे प्रशासनालाही मोठा फटका बसला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांच्या अनुयायामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये उद्भवलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे सलग तिसºया दिवशीही म्हणजे सोमवारी नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस आणि नांदेड-श्रीगंगानगर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्यामुळे पंजाबला जाणारे प्रवासी नांदेडात अडकून पडले असून रेल्वे प्रशासनालाही मोठा फटका बसला आहे़डेरा सच्चा सौदाचे बाबा राम-रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर शुक्रवारपासून पंजाब आणि हरियाणामध्ये त्यांच्या समर्थकांकडून जाळपोळ आणि हिंसाचार केला जात आहे़ त्यामुळे पंजाब, चंदीगड आणि हरियाणातील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे़ अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ उत्तर भारतातून नांदेडकडे येणाºया बहुतांश गाड्या विलंबाने धावत आहेत़ त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने सचखंड आणि श्रीगंगानगर एक्स्प्रेस रद्द केली होती़रविवारीही या मार्गावरील प्रवासी नांदेडातच अडकून पडले होते़ त्यात २८ आॅगस्ट रोजीही नांदेड- अमृतसर आणि श्रीगंगानगर या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़पंजाब येथून नांदेडातील सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात, परंतु गेल्या तीन दिवसांपासून नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस रद्द झाल्यामुळे पंजाबला जाणारे भाविक नांदेडातच अडकून पडले आहेत़ सोमवारीही ही गाडी रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून त्याचा रेल्वेलाही मोठा फटका बसला आहे़ रेल्वे प्रवाशांना होणाºया त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनानेही दिलगिरी व्यक्त केली आहे़