शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाने उपसरपंचाला बनविले चोर

By admin | Updated: June 23, 2016 01:39 IST

औरंगाबाद : यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले. अनेक बागायदारांना मजुरीला जाण्याची वेळ आणली, शेतमजुरांना भीक मागण्याची वेळ आणली,

औरंगाबाद : यंदाच्या दुष्काळाने बळीराजाला नको नको ते करायला भाग पाडले. अनेक बागायदारांना मजुरीला जाण्याची वेळ आणली, शेतमजुरांना भीक मागण्याची वेळ आणली, काही शेतकऱ्यांना तर मृत्यूला कवटाळणे भाग पडले... याच दुष्काळामुळे वैजापूर तालुक्यातील शिरसगावच्या अशाच एका माजी उपसरपंच राहिलेल्या प्रतिष्ठित शेतकऱ्याला कर्जबाजारी परिस्थितीने चक्क चोर बनावे लागले...राजेंद्र साहेबराव डुसिंग (४८, रा. शिरसगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ग्रामसेवकाच्या घरात घुसून जबरी चोरी केल्याच्या गुन्ह्यात सायबर क्राईमच्या पथकाने त्यांना अटक केली. त्याचे झाले असे की, वाळूज परिसरातील शिवराई येथील सुरेखा कुंजर या १७ जून रोजी दुपारी आपल्या घरात बसलेल्या होत्या. अचानक हेल्मेट परिधान केलेला एक व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्या घरासमोर आला. मोटारसायकल उभी करून तो घरात आला. आत येताच ‘काय वहिनी ओळखले का?’ असे म्हणत त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. त्यावर हेल्मेट असल्यामुळे सुरेखा कुंजर यांनी त्यांना ओळखले नाही; परंतु पाणी आणून दिले. घरात कुणी नसल्याची संधी साधून ‘त्या’ हेल्मेटधारीने चाकू काढला आणि ‘गप्प बसा, आरडाओरड केली तर ठार मारीन’ अशी धमकी देऊन कुंजर यांच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे गंठण हिसकावून घेतले. तसेच घरात असलेला मोबाईल व एक हजार रुपयेही लुटले आणि क्षणभरात ही लूट करून मोटारसायकलवर पसार झाला. भरदिवसा घडलेल्या लुटमारीच्या या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या जबरी चोरीप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात हेल्मेटधारीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. तांत्रिक पुराव्याआधारे पोलिसांना सापडला माग...या घटनेत मोबाईल चोरीस गेला होता. त्यामुळे सायबर क्राईमचे सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, फौजदार आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक बाबीने या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू केला. अखेर हा गुन्हा शिरसगावातील माजी उपसरपंच असलेल्या राजेंद्र डुसिंग या शेतकऱ्याने केल्याची पक्की माहिती आणि पुरावे पोलिसांना सापडले. त्यारून सायबर क्राईमचे पथक काल आरोपी राजेंद्रपर्यंत पोहोचले. पोलिसांनी त्यांस अटक केली. अटकेनंतर लगेच आरोपीने ‘होय, साहेब परिस्थितीमुळे मी हा गुन्हा केला’ अशा स्पष्ट शब्दात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीचे गंठण, मोबाईल व गुन्ह्यासाठी वापरलेली मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली. उसने पैसे आणण्यासाठी गेलो अन्...वास्तविक पाहता आपण कुंजर यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने गेलोच नव्हतो. उसने पैसे मागण्याच्या उद्देशाने गेलो होतो, असे आरोपी राजेंद्र डुसिंग यांनी पोलिसांना सांगितले. डुसिंग हे उपसरपंच असताना सुरेखा कुंजर यांच्या घरचे शिरसगावला ग्रामसेवक होते. त्यामुळे कुंजर आणि डुसिंग यांची चांगली ओळख होती. हलाखीच्या परिस्थितीत कुंजर आपल्याला काही आर्थिक मदत करू शकतात, असे वाटल्याने आपण उसने पैसे मागण्याच्या (पान २ वर)