शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाइल चोरट्यांना सोयीचे ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:02 IST

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : आकाराने मोठे डिस्प्लेचे मोबाइल वापरण्याचा नवा ट्रेंड आला आहे. मात्र, हे मोबाइल ना हातात ...

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : आकाराने मोठे डिस्प्लेचे मोबाइल वापरण्याचा नवा ट्रेंड आला आहे. मात्र, हे मोबाइल ना हातात बसतात ना खिशात मावतात. असे मोबाइल सोबत बाळगणे अवघड होऊन बसते. हेच मोबाइल चोरणे चोरट्यांना सोयीचे ठरत आहे. हे वाचून आपणास आश्चर्य वाटेल, पण ते सत्य आहे. मागील दोन ते तीन वर्षांत जेवढे मोबाइल चोरीला गेले त्यात आकाराने मोठ्या डिस्प्लेच्या हँडसेटची संख्या जास्त आहे.

मोबाइलमध्ये केवळ फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट नंबर एवढेच नसते तर विविध सोशल मीडिया अकाऊंटस्‌, बँक अकाऊंटसदेखील ओपन असतात. यामुळे मोबाइल हरविल्यावर संपूर्ण जगाशी आपला संपर्क तुटतो. बेचैनी वाढते. त्यात आता ६ इंचापेक्षा मोठे डिस्प्ले असलेले मोबाइल खरेदीची फॅशन आली आहे. मोबाइल कोणत्या कंपनीचा व किती मोठा आहे हा एक स्टेटस सिम्बॉल बनला आहे. मात्र, हेच मोबाइल आता डोकेदुखी बनले आहेत. कारण, हातात बसत नाही आणि खिशातही मावत नाही. यामुळे मोबाइल चोरांना हातातून मोबाइल हिसकावणे सोपे झाले आहे. मोठ्या डिस्प्लेचे मोबाइल वापरणे व त्यांची काळजी घेणे अवघड झाले आहे.

चौकट

शहरातील मोबाइल चोरीच्या घटना

वर्ष मोबाइल चोरीच्या घटना

२०१८--- २०२

२०१९--- १५०

२०२१--- १९०

---

चौकट

या भागांमध्ये मोबाइल सांभाळा...

१) मागील तीन वर्षांत मोबाइल चोरीच्या जास्त घटना जाधववाडी येथील भाजीपाला आडत बाजारात घडल्या आहेत.

२) याशिवाय रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बस स्टँड, औरंगपुरा, सिडको, गारखेडा परिसर, शहानुरमियाँ दर्गा चौक, निरालाबाजार हा भाग.

३) छोटा पंढरपूर, वाळूज महानगर या भागातही मोबाइल चोरीच्या घटना घडत असतात.

----

चौकट

१) मोबाइल चोरीला गेला व तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला तर तो मोबाइल हँडसेट चोरीला नव्हे गहाळ झाला, असा उल्लेख केला जातो.

२) मोबाइल चोरीला गेल्यावर लगेच त्याची तक्रार लिहून घेतली जात नाही. दोन ते तीन दिवसांनंतर फोन सापडला नाही तर तक्रार दाखल करून घेतली जाते.

३) मोबाइल चोरीला नव्हे, तर तो तुम्ही कुठे तरी विसरला असाल, जर सापडला नाही तर मग तक्रार नोंदवा, असेही पोलीस सांगतात, असे काही नागरिकांनी सांगितले.