शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ये रे, ये रे पावसा़़!

By admin | Updated: June 16, 2014 01:15 IST

लातूर : अर्धा जून उलटला तरी अजूनही मान्सूनचे आगमन झाले नाही़ आतापर्यंत केवळ १५ मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद आहे़

लातूर : अर्धा जून उलटला तरी अजूनही मान्सूनचे आगमन झाले नाही़ आतापर्यंत केवळ १५ मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद आहे़ त्यामुळे पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी खत-बियाणे खरेदीकडेही पाठ फिरविली आहे़ मागील जवळपास दहा वर्षांची सरासरी लक्षात घेता मान्सूनच्या विलंबामुळे पेरणीचा श्रीगणेशा आता जुलैमध्येच होऊ लागला आहे़लातूर जिल्ह्याची जून महिन्यातील पावसाची सरासरी १४५ मिलीमीटर इतकी आहे़ परंतु, गेल्या दहा वर्षांत केवळ २००७ चा अपवाद वगळता एकदाही मान्सूनने सरासरीची लक्ष्मणरेषा ओलांडली नाही़ त्यामुळे पेरणीचा हंगाम आता जवळपास जुलै महिन्यातच सुरु होऊ लागला आहे़ यावर्षीचा अर्धा जून उलटला तरी पावसाच्या सरासरीने १५ मिमीचाही आकडा ओलांडला नाही़ गतवर्षी जूनमध्ये १३० मिमी इतका सरासरी पाऊस झाला होता़ २०१२ मध्ये ११६ मिमी, २०११ मध्ये ३४, २०१० मध्ये १०९, २००९ मध्ये ८७, २००८ मध्ये ३३, २००७ मध्ये २७७, २००६ मध्ये १२७ तर २००५ साली जिल्ह्यात सरासरी ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे़ त्यामुळे मागील काही वर्षांत जूनमध्ये पेरण्या सुरु होऊ शकल्या नाहीत़ पावसाच्या अनिश्चिततेमुळे यावेळीही शेतकऱ्यांनी कृषी बाजारपेठेकडे पाठ फिरविली आहे़ सध्या खत-बियाणांसाठी शेतकरी रकमेच्या तडजोडीत गुंतले आहेत़