शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:41 IST

सप्टेंबरचा पहिला आठवडा संपल्यानंतर जिल्ह्यात ५३.४४ टक्के पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: माहूरसह हिमायतनगर आणि देगलूर तालुक्यातील परिस्थिती पावसाअभावी बिकट झाल्याचे चित्र असून या तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ४० टक्के पाऊसही अद्याप झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सप्टेंबरचा पहिला आठवडा संपल्यानंतर जिल्ह्यात ५३.४४ टक्के पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेषत: माहूरसह हिमायतनगर आणि देगलूर तालुक्यातील परिस्थिती पावसाअभावी बिकट झाल्याचे चित्र असून या तालुक्यांत वार्षिक सरासरीच्या ४० टक्के पाऊसही अद्याप झालेला नाही.यंदा जूनच्या प्रारंभीच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकºयांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र मध्यंतरीच्या काळात पावसाने मोठी ओढ दिल्याने पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात तीन दिवस पाऊस मुक्कामी होता. याच कालावधीत जिल्ह्यातील १६ पैकी १२ तालुक्यांत अतिवृष्टीही झाली. या पावसामुळे चार वेळेस विष्णूपुरीचे दरवाजे उघडावे लागले. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली आहे. ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५३.४४ टक्के इतका पाऊस झाला असून नांदेड तालुक्यात ८३.०१, मुदखेड ८४.६८, अर्धापूर ६९.८६, भोकर ५३, उमरी ४९.९५, कंधार ६१.३७, लोहा ६१.३२, किनवट ४०.३८, हदगाव ५३.९६, बिलोली ५०.०४, धर्माबाद ५१.०१, नायगाव ५२.७८ तर मुखेड तालुक्यात ५६.३५ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात वाईट परिस्थिती माहूर तालुक्यातील असून येथे आजवर वार्षिक सरासरीच्या अवघ्या ३१.१६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. हिमायतनगर तालुक्यातही अशीच परिस्थिती असून तेथे सरासरीच्या ३७.६४ टक्के तर देगलूर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ३७.१० टक्के इतका पाऊस झाला आहे.