एस़ पी़ शिंदे , डोंगरशेळकीडोंगरशेळकी डोंगरशेळकीचे नाव घेतले की पहिल्यांदा नजरेसमोर येतात ते समर्थ धोंडूतात्या अन् जिव्हेवर तरळतो तो येथील खव्याचा स्वाद़ धोंडूतात्यांच्या पावनभूमीत खव्याचा व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला आहे़ परंतु, यंदा चारा-पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने खव्याचे उत्पादन अर्ध्यापेक्षाही खाली उतरले आहे़ मात्र, शनिवारी झालेल्या पावसाने खवेकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़डोंगरशेळकीला श्री समर्थ धोंडूतात्यांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी पेढा, खवा तयार करता करता येथील व्यवसायिकांनी आपला ब्रॅन्ड कधी तयार केला हे त्यांनाही कळले नाही़ डोंगरशेळकीचा खवा, पेढा म्हटले की खवैय्ये अगदी डोळे झाकून त्याची खरेदी करतात़ शुद्धता व स्वादाशी कधी येथील व्यवसायिकांनी प्रतारणा केली नाही़ त्यामुळेच गावातून दररोज ३०० किलोग्रॅम खवा गावाबाहेर पडतो़ त्यावर जवळपास ५० कुटूंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे़ इतकेच नव्हे तर खव्यासाठी लागणाऱ्या दुधामुळे अनेक दुग्ध उत्पादकांनाही मोठा आर्थिक आधार लाभला आहे़ परंतु, यंदा मघा नक्षत्राच्या अखेरपर्यंत चांगला पाऊस नसल्याने चारा-पाण्याची टंचाईची निर्माण झाली़ त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावर झाल्याने खवा व्यवसायही अडचणीत आला़ डोंगरशेळकीत गोपीनाथ इंगळेवाड, शंकर मुंढे, संतोष रोकडे, गोपाळ रोकडे रामकिशन शेळके, तुकाराम मुंढे, पंढरी मुंढे, गोविंद मुंढे, समाधान मुंढे, रावसाहेब मुंढे, ज्ञानोबा मरेवाड, बालाजी मरलापल्ले, प्रल्हाद राठोड, श्याम राठोड यांच्यासह पन्नासावर कुटूंब खव्याच्या व्यवसायात आहेत़ त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला़ पूर्वी २४ तास पेटलेल्या असलेल्या भट्ट्या आता पाच-सहा तासही चालेनाश्या झाल्या आहेत़ परंतु, शनिवारी झालेल्या पावसामुळे खवा उत्पादनाला गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे़डोंगरशेळकीत खव्याच्या उत्पादनसाठी दुधाला मोठी मागणी आहे़ पूर्वी दररोज ३०० किलो खवा उत्पादित केला जात होता़ १ किलो खव्यासाठी ४ लिटर्स दूध लागते़ त्यानुसार १२०० लिटर्स दूध स्थानिक डोंगरशेळकीसह शेजारच्या गुडसूर, खेर्डा, हिप्परगा, कल्लूरमधून येत असत़ परंतु, टंचाईमुळे दुधाची आवक केवळ ४०० ते ५०० लिटर्सपर्यंतच मर्यादित राहिली असल्याने खवा उत्पादनावर परिणाम झाला आहे़दूध कमी झाल्यामुळे खवा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे़ पूर्वी एका भट्टीवर ६ ते ८ किलो खवा काढला जात होता़ परंतु, आता हेच प्रमाण २ किलोवर आहे़ दुग्ध उत्पादन घटल्याने अडचणी वाढल्या आहेत़ परंतु, आता झालेल्या पावसामुळे थोडीशी मदत होईल, अशी आशा खवा उत्पादक गोपीनाथ इंगळेवाड, शंकर मुंढे, संतोष रोकडे व इतरांनी व्यक्त केली़
खव्याची भट्टी होतेय थंड़़!
By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST