शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात जागा नाही, २५०० रुग्णांवर घरीच उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:03 IST

औरंगाबाद : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची चाैकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १० शिक्षकांची टीम कामाला लावली आहे. महापालिकेच्या ...

औरंगाबाद : होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या आरोग्याची चाैकशी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १० शिक्षकांची टीम कामाला लावली आहे. महापालिकेच्या कोविड वॉरमध्ये ही टीम कार्यरत असून, दररोज होम आयसोलेशनमधील रुग्णांशी फोनवर संपर्क केला जात आहे. एका रुग्णाच्या आरोग्याची सतत १० दिवस या टीमकडून माहिती घेतली जाणार आहे.

शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपलब्ध सरकारी व खासगी रुग्णालयांतील बेड्स अपुरे पडत आहेत. त्यामुळे लक्षणे नसलेल्या आणि अतिशय सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये घरीच उपचार दिले जात आहेत. यासाठी रुग्णाच्या फॅमिली डॉक्टरांकडून किंवा तो राहत असलेल्या संबंधित परिसरातील त्यांच्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र रुग्णाला पालिकेकडे सादर करावे लागते. त्यानंतर संबंधित डॉक्टरकडूनच या रुग्णांना आवश्यक औषधे व उपचार दिले जातात, तसेच त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे का, याविषयी रोजची विचारपूस पालिकेच्या यंत्रणेकडून केली जाते. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले की, होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या आरोग्याची विचारपूस करण्यासाठी पालिकेच्या कोविड वॉररूममध्ये १० शिक्षकांची नियुक्‍ती केली आहे. या दहा शिक्षकांच्या टीमकडे होम आयसोलेशन रुग्णांचा मोबाइल क्रमांकासह डाटा दिलेला आहे. त्यानुसार रोज संबंधित रुग्णांशी संपर्क करून त्यांच्या आरोग्याची माहिती घेतली जात आहे. यात काही रुग्णांत गंभीर लक्षणे जाणवल्यास पालिकेचे पथक त्यांच्या घरी जाते. आवश्यकता भासल्यानंतरच संबंधित रुग्णास कोविड सेंटरमध्ये दाखल केेले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

होम आयसोलेशनचाही वाढतोय आकडा

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने होम आयसोलेशनमधील रुग्णांचाही आकडा वाढत चालला आहे. रविवारच्या प्राप्‍त अहवालानुसार, शहरात तब्बल २,५०० रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत.