शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:40 IST

महापौर निवडणुकीत भाजप स्वतंत्र उमेदवार न देता युतीतच राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने गुरुवारी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करताच महापालिकेत राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. सेनेसोबत असलेली युती तोडून भाजपतर्फे स्वतंत्र उमेदवार देण्याची भाषा मागील काही दिवसांपासून स्थानिक नेत्यांकडून सुरू होती; मात्र महापौर निवडणुकीत भाजप स्वतंत्र उमेदवार न देता युतीतच राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. युती धर्मानुसार भाजप उपमहापौरपदावर समाधान मानणार आहे.महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचा पाच वर्षांसाठी लेखी करार झाला आहे. करारानुसार निवडणुकीनंतर प्रथम १५ महिने महापौरपद सेनेने आपल्याकडे ठेवले. उर्वरित १२ महिने भाजपला देण्यात आले. पुढील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अडीच वर्षे सेनेकडे महापौरपद राहणार असल्याने भाजपमधील काही इच्छुकांनी युती तोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक नेत्यांना हाताशी धरून मागील काही दिवसांपासून भाजप महापौर निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची ‘हवा’ करण्यात आली. अडीच वर्षांपासून महापालिकेत युतीचा संसार सुखाने सुरू असताना फक्त महापौरपदासाठी पक्षाला कशाला बदनाम करायचे, असा सूर भाजप नेत्यांनी आळवला आहे. विशिष्ट मंडळींसाठी पक्षाला बदनाम करायचे नाही, अशीही चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. भाजपने आता युती तोडली तर येणाºया अडीच वर्षांमध्ये वॉर्ड सभापती, स्थायी समिती अशा अनेक पदांना मुकावे लागणार आहे. महापालिकेत भाजपचे संख्याबळ एमआयएमपेक्षाही कमी आहे. भाजपकडे चिन्हावर निवडून आलेले फक्त २३ नगरसेवक आहेत. गजानन बारवाल यांच्या अपक्ष आघाडीने भाजपला आजपर्यंत पाठिंबा दर्शविला आहे. येणाºया महापौर निवडणुकीत बारवाल यांना भाजपचा ‘व्हीप’ही चालणार नाही. या अपक्ष आघाडीने सेनेसोबत घरोबा केला तर भाजपची प्रचंड नाचक्की होऊ शकते. कारण बारवाल आणि घोडेले यांचे स्नेहसंबंध संपूर्ण शहराला माहीत आहेत.