शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइंचा एकही आमदार नाही, आत्मचिंतन करा

By admin | Updated: November 9, 2016 00:53 IST

उस्मानाबाद : मी स्वत: कधीही निवडणुकीसाठी आग्रही राहिलो नाही.

उस्मानाबाद : मी स्वत: कधीही निवडणुकीसाठी आग्रही राहिलो नाही. पद असो-नसो; जनतेची कामे करीत गेलो आणि म्हणूनच केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चितपणे जनतेचे प्रश्न सोडविता येतात. त्यामुळे पद, सत्तेची अपेक्षा न ठेवता एकनिष्ठपणे काम करा. इतकी वर्षे संघटन कार्यरत असूनही पक्षाचा एकही आमदार निवडून का येत नाही, याबाबत आत्मचिंतन करा, असा सल्ला सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने शहरातील भीमनगर भागातील क्रांती चौकात आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे ज्येष्ठ नेते राजा सरवदे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, जि.प.चे समाजकल्याण सभापती हरिष डावरे, रिपाइंचे प्रदेश चिटणीस संजय बनसोडे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. उस्मानाबाद जिल्ह्याशी माझे ऋणानुबंध आहेत. पँथरच्या चळवळीत हा जिल्हा मोठ्या ताकदीने माझ्या मागे उभा होता. अनेक वर्षे कसल्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी जनतेची कामे करीत राहिलो. त्यामुळेच नरेंद्र मोदींनी मंत्रीमंडळात समावेश करून घेतल्याचे सांगत भाजपा सरकारने देशातील मागासवर्गीयांसाठी अनेक चांगल्या योजना सुरू केल्या असून, हे सरकार संविधानाला हात लावणार नाही, अशी ग्वाहीही दिली असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळात मी स्वत: असल्याने देशाची घटना तसेच मागासवर्गीय, कष्टकरी, वंचितांच्या हितासाठी सदैव जागरूक राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी माझी पूर्वीपासूनची भूमिका आहे. हे आरक्षण देताना अनुसूचित जाती-जमाती तसेच ओबीसींच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, ही बाबही आपण स्पष्ट केली असल्याचे ते म्हणाले. आरक्षणाला पाठिंबा असला तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात मात्र कसलाही बदल होवू देणार नाही. कारण तो कायदा अत्याचार रोखण्यासाठी आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.