औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सिडको चौक ते रामगिरी हॉटेलपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम सुरू केले असून, त्यासाठी एन-३, एन-४ च्या बाजूने असलेल्या ग्रीनबेल्टमधील १४८ झाडे जाणार असून, त्या मोबदल्यात मनपा सर्व्हिस रोड महामंडळाकडून करून घेणार आहे. पहिल्या टप्प्यात ३८ झाडे जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित झाडे जातील. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्यासह नगरसेवक प्रमोद राठोड, वृक्षसंवर्धन समितीचे दिलीप यार्दी, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी. पी. कुलकर्णी, उद्यान अधीक्षक विजय पाटील यांच्यासह रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांची उपस्थिती होती. आयुक्त म्हणाले, १४८ झाडे जाणारच आहेत. स्पील वे राहणार आहे. १० फूट स्पेस शिल्लक राहील. झाडांच्या मोबदल्यात दोन्ही बाजूने ७-७ मीटरचा सर्व्हिस रोड मनपाला करून मिळेल. त्या अनुषंगाने रस्ते विकास महामंडळाला पत्र देण्यात येणार आहे. सर्व्हिस रोडची रुंदी कमी होणार नाही. ग्रीनबेल्ट विकसित करून द्या ग्रीनबेल्टची फक्त १० फूट जागा पुलाच्या कामामुळे शिल्लक राहील. त्यामुळे ग्रीनबेल्ट संपणारच आहे. १४८ झाडांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये अनामत घेण्यात येणार आहे. एपीआय कॉर्नर ते हायकोर्टपर्यंतचा ग्रीनबेल्ट त्या पुलासाठी बाधित होईल. उर्वरित ग्रीनबेल्ट रस्ते विकास महामंडळाने विकसित करून देण्याची मागणी नगरसेवक प्रमोद राठोड यांनी केली.
सिडको उड्डाणपुलासाठी १४८ झाडे जाणार
By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST