शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चार मोटारसायकलींसह एका कारची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:05 IST

औरंगाबाद : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. अलीकडे शहरातून चार मोटारसायकली व एक कार चोरी झाल्याच्या ...

औरंगाबाद : शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. अलीकडे शहरातून चार मोटारसायकली व एक कार चोरी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आग्रेल जोसेफ शिणगारे (५२, रा. नंदनवन कॉलनी) यांनी ९ जानेवार रोजी रात्री आपली दुचाकी (एमएच-२० बीएम-९१६५) नंदनवन कॉलनीतील गणशिवगौरी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमेश्वर एकनाथ चव्हाण (३१, रा. सूतगिरणी परिसर, म्हाडा क्वॉर्टर्स, गारखेडा) हे मुकुंदवाडीतील जय बालाजी हॉटेलमध्ये मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. त्यांनी हॉटेलसमोर आपली दुचाकी (एमएच-२० ईआर-२७७५) उभी करून ठेवली होती. ती २ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजेदरम्यान चोरीला गेली. याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ जानेवारी रोजी यारखान सईद हबीब यारखान (५०, रा. मिल कॉर्नर, कोतवालपुरा) यांचे गॅरेज आहे. त्यांनी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर दुचाकी (एमएच-२० डीएल-०९७८) उभी केली होती. चोरट्याने हँडल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संदीप विश्वनाथ महाजन (४८, रा. एन-७ सिडको) यांनी ९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरासमोर उभी करून ठेवलेली दुचाकी (एमएच-२० डीजी-७९१४) चोरट्याने चोरून नेली.

चौकट.....

काच फोडून कारचा दरवाजा उघडला

सत्यमनगर, एन-५ सिडको येथील रहिवासी राहुल विकास देशमुख (३६) यांनी ८ जानेवारी रोजी घरासमोर कार (एमएच-२० डीजे-४२७०) उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून दरवाजा उघडला व आत प्रवेश करून ती चोरून नेली. त्यांनी शहरात कारचा शोध घेतला; पण ती कुठेही आढळून आली नाही. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.