शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

योगसाधनेतून दिला तणावमुक्ती संदेश

By admin | Updated: June 22, 2016 00:56 IST

औरंगाबाद : ‘योगासने करा आणि तणावमुक्त जीवन जगा’, असा संदेश देत मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शाळा, महाविद्यालयांची सकाळ योगसाधनेत रंगली.

औरंगाबाद : ‘योगासने करा आणि तणावमुक्त जीवन जगा’, असा संदेश देत मंगळवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध शाळा, महाविद्यालयांची सकाळ योगसाधनेत रंगली. शरीर, मन, आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी योगासने महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतीय परंपरा व संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून योग व प्राणायामांकडे बघितले जाते. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी आणि क्रीडा भारती यांच्यातर्फे विविध ठिकाणी योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरूझालेली योगासने आणि सुमारे तासभर चाललेली योगसाधना, असे उत्साही वातावरण सर्वत्र पाहायला मिळाले.आंतरराष्ट्रीय योगदिनाचा मुख्य कार्यक्रम गारखेड्यातील विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आला. वेगवेगळ््या भागातील शेकडो नागरिक योगसाधनेच्या उद्देशाने सकाळी सात वाजता तेथे एकत्र जमले. पतंजली योगपीठाचे राज्यप्रभारी शैलेश माकणीकर आणि योग शिक्षक विजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगासने व प्राणायामाचे धडे गिरविले. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोरमारे, उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे आदींची उपस्थिती होती. योगसाधनेत सहभागी झालेल्यांनी उभी, बैठी आणि निद्रावस्थेतीतील विविध आसनांचे धडे गिरविले. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, उष्ट्रासन, शशकासन, उत्तानमंडुकासन, मरिच्यासन, मकरासन, शलभासन, सेतूबंध, उत्तानपाद पवन मुक्तासन, शवासन ही आसने शिस्तबद्धरीत्या सादर करण्यात आली. मानव जातीच्या कल्याणासाठी ऋषीमुनींनी प्राणायामांचा आविष्कार केला. ताणतणावाचे व्यवस्थापन प्राणायामांच्या माध्यमातून करता येते. कपालभाती, नाडीशोधन, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान ही प्राणायमे याप्रसंगी सादर करण्यात आली. तणावमुक्ती आणि आजारापासून मुक्ती देणाऱ्या योगासनांच्या प्रचारासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.उपकेंद्रांतही लगबगशहरातील इतर दहा उपकेंद्रांतही आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. बळीराम पाटील हायस्कूल, धर्मवीर संभाजी हायस्कूल, श्रीहरी पॅव्हेलियन, एमजीएम क्रीडा संकुल, सरस्वती भुवन हायस्कूल, पीईएस शारीरिक शिक्षण कॉलेज, सुशीलादेवी हायस्कूल, ज्ञानेश विद्यामंदिर, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, गोदावरी पब्लिक स्कू लयेथे योग दिनाचे कार्यक्रम घेण्यात आले.सिडकोत योग प्रात्यक्षिक कार्यक्रमजागतिक योग दिनानिमित्त मंजू ठोले यांच्या वतीने सिडको, एन-३ येथील सूर्या गार्डन येथील सभागृहात योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात नीलम पोखर्णा, प्रीती सुराणा, उषा चौधरी, विम्मी आनंद, ज्योती कटारिया, रत्ना देवडा, विद्या बाफना, राजश्री मोगले, पुष्पा पानपट्टे, तनुजा गोलेवार, सरिता जाजू, संध्या ठोले, सुजाता संघवी, सुनीता छल्लानी, सविता पांडे, वीणा तयाल, अश्विनी तळेकर, नमिता बुंदलिया, पिंकी संकलेचा, रीना कासलीवाल, क्षमा पांडे, अंकिता पाटणी, कावेरी बहुरे, सुरक्षा कटारिया, सर्वेषा कटारिया, राशी पांडे, अपूर्वा, अनिशा, प्रेरणा देवडा, सायली दरख यांनी सहभाग नोंदवीला. संचालन मेघा कासलीवाल यांनी केले.जिल्हा प्रशासन, शिक्षणाधिकारी, क्रीडा उपसंचालक व क्रीडा भारतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कार्यक्रमात अधिकाऱ्यांनी ४५ मिनिटांची योगासने केली. मकरासन, भुजंगासन, शलभासन, सेतुबंध आसन, उत्तानपाद आसन, अर्धहलासन तसेच प्राणायामामध्ये कपाल भारती, अनलोम विलोम, शितली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व ध्यानाचे धडे अधिकाऱ्यांनी गिरविले. विभागीय क्रीडा संकुलात सकाळी ७ वा. हा मुख्य शासकीय कार्यक्रम झाला. औरंगाबाद : लोकमत व द आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने आयोजित योगा, प्राणायाम व ध्यानधारणा शिबिराने आम्हाला नवऊर्जा मिळाली. शरीरात नवचेतना निर्माण झाल्याचे जाणविले... जागतिक योग दिनापुरतेच मर्यादित न राहता निरोगी आरोग्यासाठी आता आयुष्यभर योगा, प्राणायाम करू असा संकल्प साधकांनी केला आणि हेच या शिबिराचे फलित ठरले. जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने आयोजित ५ दिवसीय शिबिराची सांगता मंगळवारी सकाळी झाली. लोकमत भवन येथे या शिबिरात मागील ४ दिवसांपासून शेकडो साधकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन योगा, प्राणायाम व ध्यानधारणा केली. डॉ.नमिता हजारी, छाया भालेकर, संगीता पाटील, सुलभा भालेकर या योग शिक्षिकांनी साधकांकडून प्रात्यक्षिक करुन घेतले.त्यांना डॉ.अजित हजारी, प्रभंजन महातुले, अखिल भालेकर, शिवशंकर स्वामी यांनी सहकार्य केले. सर्व योग शिक्षकांचा सत्कार लोकमतच्या एच.आर. विभागाचे सहायक उपाध्यक्ष बालाजी मुळे यांनी केला. या पाच दिवसीय शिबिराने आम्हाला फायदा झाला, आमच्यात नवऊर्जा निर्माण झाली. सकाळी लवकर उठण्याची सवय लागली. शरीराच्या व्याधी कमी झाल्या, अशा एक ना अनेक उत्स्फूर्त प्रतिक्रिया साधकांनी व्यक्त केल्या. ओम पंचनादाने वातावरण मंगलमय जागतिक योग दिन व संगीत दिनाचे औचित्य साधून शरद दांडगे यांच्या ‘ओम पंचनाद’ या तालमय कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते. दांडगे यांनी एकसाथ विविध २५ प्रकारची भारतीय वाद्ये वाजवून सर्वांना तालमग्न केले. विविध प्रांतातील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांची झलक यावेळी ऐकण्यास मिळाली. एक व्यक्ती एकसाथ एवढ्या प्रकारची वाद्ये वाजवितो हे पाहून सर्व प्रभावित झाले होते. ७ ते ७.३० वाजेदरम्यान ओम पंचनाद व त्याननतर ७.३० ते ८.३० वाजेदरम्यान योगा, प्राणायाम व ध्यानधारणा करण्यात आली.