शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात दहा जणांचे जबाब

By admin | Updated: January 15, 2016 23:38 IST

नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़

नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़ गोडसेने लिहिलेल्या मृत्युपूर्वी चिठ्ठीवरुन लातूर पोलिस पथकाने बारड येथील दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत़ यातील नावांचा खून प्रकरणाची संबंध आहे किंवा केवळ राजकीय वैमनस्यातून ती टाकण्यात आली याबाबतची सत्यता पोलिस पडताळून पाहत आहेत़२९ डिसेंबर रोजी प्रा़ कपिल भिमेवार याचे प्रेत असदवन शिवारात सापडले होते़ याप्रकरणात तीन आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार असलेल्या नंदू गोडसे याने लातूर जिल्ह्यातील देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली आहे़ या आत्महत्येसाठी गोडसे याने नवीन दोर विकत घेतला होता़ तसेच त्याच्या पोटाला बांधलेल्या डायरीत त्याने मृत्युपूर्व लिहून ठेवले होते़ ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोडसेने आत्महत्या केली़ ही शाळा मुख्य रस्त्यावरच आहे़ तसेच गोडसे याचे काही नातेवाईकही देवणी परिसरात आहेत़ त्यामुळे खुनाच्या घटनेनंतर गोडसे हा लातूर जिल्ह्यातच वास्तव्याला असल्याची शक्यता बळावली आहे़ दरम्यान, गोडसे याने चिठ्ठीत नमूद केलेल्या दहा जणांच्या नावाच्या आधारे लातूर पोलिसांनी तपास सुरु केला होता़ त्यानुसार दोन दिवसांपूर्वी लातूरचे पथक बारड येथे आले होते़ त्यांनी यावेळी दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले़ या जबाबाच्या आधारे यापैकी कुणाचा प्राध्यापक भिमेवार याच्या खून प्रकरणाची संबंध आहे किंवा नाही याची पडताळणी पोलिस करीत आहेत़ या प्रकरणात गोडसे याला सुपारी देणारा अद्यापही मोकळाच असून पोलिसांना तपासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तर दुसरीकडे बारडमध्ये मात्र उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील खरा आरोपी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ (प्रतिनिधी)