शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टेम्पोने कामगारास चिरडले

By admin | Updated: October 9, 2016 01:08 IST

वाळूज महानगर : सायकलवरून कंपनीत कामाला चाललेल्या एका कामगारास भरधाव टेम्पोने चिरडल्याने तो जागीच ठार झाला.

वाळूज महानगर : सायकलवरून कंपनीत कामाला चाललेल्या एका कामगारास भरधाव टेम्पोने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. अपघातानंतर चालक टेम्पोसह फरार झाला. ही घटना शनिवारी (दि. ८) सकाळी ७ वाजेदरम्यान बजाजनगरातील एफडीसी चौकात घडली.सोमनाथ काशीनाथ कुंभार (३५, रा. घोडेगाव कुकाणा, ता. नेवासा. जि. अहमदनगर, ह. मु. रांजणगाव शेणपुंजी) वाळूज औद्योगिक क्षेत्रातील औरंगाबाद आॅटो या कंपनीत कामाला आहे. सोमनाथ कुंभार शनिवारी सकाळी रांजणगाव येथून सायकलवर कंपनीत कामाला निघाले. सकाळी ७ वाजेदरम्यान बजाजनगरातील एफडीसी चौकात पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने (क्रमांक एमएच- २०, सीटी ११४१) कुं भार यांच्या सायकलला जोराची धडक दिली. या धडकेने कुंभार खाली पडले. भरधाव टेम्पोचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात कुंभार जागीच ठार झाले. घटनास्थळावरून चालक टेम्पोसह पळून गेला. प्रत्यक्षदर्शी असलेले सुरेश गाडेकर यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर अर्ध्या ते पाऊण तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडलेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी विचारपूस सुरू केली. औरंगाबाद आॅटो कंपनीतील सुपरवायझर गजानन राघुडे यांनी सदर व्यक्ती ही सोमनाथ कुंभार असून, तो औरंगाबाद आॅटो कंपनीत काम करीत असल्याचे सांगितले. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सुरेश गाडेकर, कुंदन जाधव, सोमीनाथ सावंत, दिलीप पाटील यांच्या मदतीने कुंभार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेला. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी फरार टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार भास्कर खरात हे पुढील तपास करीत आहेत.