शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या ढोल-ताशांचा निनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:00 IST

प्रोझोनच्या हिरवळीवर ‘ती’ने केलेले पवित्र, मांगल्यदायी ढोल-ताशा वादन पाहून उपस्थित लोक समुदाय आश्चर्यचकित झाला आणि ‘ती’च्या कौशल्याला भरभरून दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गणेशोत्सवाचा उत्साह, आनंद द्विगुणित होतो तो ढोल-ताशांच्या जोशपूर्ण वादनाने. आजवर ढोल-ताशा वादन करावे, तर ते फक्त पुरुषांनीच असे जणू अघोषितपणे ठरलेले होते. मात्र प्रोझोनच्या हिरवळीवर ‘ती’ने केलेले पवित्र, मांगल्यदायी ढोल-ताशा वादन पाहून उपस्थित लोक समुदाय आश्चर्यचकित झाला आणि ‘ती’च्या कौशल्याला भरभरून दाद देत टाळ्यांचा कडकडाट केला.टाटा टी गोल्ड मिक्स्चर प्रस्तुत ‘लोकमत’ ‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत रविवारी दुपारी प्रोझोन येथे ढोल- ताशा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांच्या सन्मानासाठी एकत्रित येऊन शहरातील विविध ढोल पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.स्पर्धेदरम्यान प्रत्येक संघाला ठराविक वेळ देण्यात आला होता. पहिल्या दहा मिनिटांमध्ये पुरुष आणि महिला असे सर्वांना मिळून एकत्रित सादरीकरण करायचे होते. शेवटच्या दहा मिनिटांत मात्र केवळ महिलांना सादरीकरण करायचे होते. या दहा मिनिटांचा योग्य उपयोग करत प्रत्येक संघाच्या महिला सदस्यांनी केलेले ढोल-ताशा वादन अतिशय उत्स्फूर्त ठरले. ढोल-ताशा वादनात आता महिला कुठेही मागे नाहीत, हेच जणू या तरुणींनी दाखवून दिले. महिलांचे ढोल-ताशा वादन पाहण्यासाठी प्रोझोन मॉल येथे आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैलेश कोरडे यांनी संचालन केले. प्रोझोन मॉल हे या उपक्रमाचे व्हेन्यू पार्टनर आहेत.सुजित नेवपूरकर, जगदीश व्यवहारे, राहुल जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.