औरंगाबाद : लोकमत युवा नेक्स्टच्या सदस्यांना मराठी चित्रपट गुलाबी टीमशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मिळणार आहे. हिंदी चित्रपट निर्माते - दिग्दर्शक गुड्डू धनोआ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करीत आहे. गुलाबी चित्रपटाच्या माध्यमातून कारकीर्दीत प्रथमच सचिन खेडेकर एका पोलीस अधिकाऱ्याच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गुड्डू धनोआ दिग्दर्शित गुलाबी चित्रपट असून, चित्रपटातील कलाकार सचिन खेडेकर, विनीत शर्मा, गायक एम. प्रकाश, अनिकेत कर्णिक आणि रेणुका कर्णिक युवा नेक्स्ट सदस्यांशी खुला संवाद साधणार आहेत. एक प्रेमकथाचित्रपट एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि एक बार डान्सर यांच्यातील प्रेमकथा आहे. बार डान्सरची भूमिका पाखी हेगडेने केली आहे.लेखक संजय चौहान यांच्या लेखणीतून गुलाबीची निर्मिती झाली आहे. माया गोविंद आणि एम. प्रकाश यांच्या गाण्यांना दिलीप सेन व सतोकसिंह धालिवाल यांनी संगीत दिले आहे.
गुलाबी चित्रपटाची टीम आज शहरात
By admin | Updated: September 5, 2014 00:52 IST