लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर : शिक्षक दिनाचा कार्यक्रम आटोपून शालेय कामानिमित्त गटसाधन केंद्रात आलेले स. वाजेद स. खालेद यांचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शिक्षक दिनीच दुपारी चारच्या सुमारास घडली.शहरातील बामणी प्लॉट भागात राहणारे स. वाजेद स. खालेद (वय ५१) हे याच भागातील डॉ.झाकीर हुसेन प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आटोपून ते शालेय कामानिमित्त मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास गटसाधन केंद्रात आले होते. तिथे बसले असताना अचानक त्यांना चक्कर आली व ते खाली पडले. आजूबाजुच्या नागरिकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले. परंतु, परभणी येथे नेत असताना रस्त्यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जामा मस्जिद कब्रस्तानमध्ये रात्री १० च्या सुमारास दफन विधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
जिंतुरात शिक्षक दिनी शिक्षकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:32 IST