बीड : खासगी संस्थेमधील शिक्षकाच्या पत्नीने गुरूवारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात पतीचे वेतन सुरू करा, अशी मागणी करीत गोंधळ घातला.केज तालुक्यातील तांबवा येथे अशोक चाटे यांची गणेश विद्यालय ही संस्था आहे. त्यावर शिवदास मुंडे शिक्षक म्हणून कार्यरत होते. संस्थेने त्यांना कार्यमुक्त केले. त्यामुळे त्यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली. न्यायाधिकरणाने १२ फेब्रुवारी २०१६ रोजी मुंडे यांना रुजू करून त्यांना ३० टक्के वेतन द्यावे, असे आदेश दिले. या निर्णयाविरूध्द संस्थेने उच्च न्यायालयात अपिल केले. उच्च न्यायालयाने प्राधिकरणाचा निर्णय रद्दबातल करीत मुंडे यांना रुजू करा किंवा ३० टक्के वेतन द्या, असे आदेश दिले. त्यानुसार मुंडे यांना संस्थेने रुजू करून घेतले होते.दरम्यान, गुरूवारी मुंडे यांचे वेतन सुरू करावे या मागणीसाठी त्यांच्या पत्नी रत्नमाला मुंडे यांनी माध्यमिक विभागात गोंधळ घातला. शिक्षणाधिकारी (मा.) एस. पी. जैस्वाल यांना त्यांनी धारेवर धरले. या प्रकारामुळे माध्यमिक विभागात बघ्यांची गर्दी झाली होती. काही कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घातली.दरम्यान, शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी १ मार्च रोजी मुख्याध्यापकांना पत्र पाठवून मुंडे यांचे वेतन व भत्ते अदा करण्याचे आदेश दिलेले आहेत. (प्रतिनिधी)
शिक्षक पत्नीचा जि.प.मध्ये गोंधळ
By admin | Updated: March 18, 2016 01:57 IST