शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक विलास काकडेला अटक; १६ पर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:31 IST

विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी पालकांनी चोप दिल्यापासून पसार झालेल्या पोदार शाळेचा शिक्षक विलास काकडे (रा. भोईवाडा) यास गुन्हे शाखा पोलिसांनी जालना जिल्ह्यातील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली.

लोकमत न्यूजनेटवर्कऔरंगाबाद : विद्यार्थिनींची छेड काढल्याप्रकरणी पालकांनी चोप दिल्यापासून पसार झालेल्या पोदार शाळेचा शिक्षक विलास काकडे (रा. भोईवाडा) यास गुन्हे शाखा पोलिसांनी जालना जिल्ह्यातील त्याच्या बहिणीच्या घरातून अटक केली. आज त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.याविषयी अधिक माहिती देताना जवाहरनगर पोलिसांनी सांगितले की, गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाºया पोदार शाळेतील गणिताचा शिक्षक विलास काकडे याच्या गैरवर्तनाचा भंडाफोड विद्यार्थिनींनीच केला. एका पालकाने ९ आॅगस्ट रोजीच शाळेत जाऊन शिक्षक काकडे याच्या कानाखाली लगावली आणि शाळा प्रशासनाकडे याविषयी त्यांनी तक्रार केली. हा प्रकार अन्य विद्यार्थिनींच्या पालकांना माहीत होताच ते सर्व जण गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शाळेत गेले. यावेळी काकडेला गाठून त्यास चांगलाच धडा शिकविण्याच्या तयारीत पालक होते. मात्र काकडेला आदल्या दिवशीच शाळेतून बडतर्फ केल्याची माहिती प्रशासनाने पालकांना दिली. यानंतर संतप्त पालकांनी काकडेविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि पालकांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. एका पालकाने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. आपल्याविरुद्ध पालक संतप्त झाल्याचे कळताच काकडे औरंगाबादेतून पळून गेला. तो जालना जिल्ह्यात राहणाºया बहिणीच्या घरी लपून बसल्याची माहिती खबºयाने गुन्हे शाखा पोलिसांना दिली. गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरा जालना जिल्ह्यातून आरोपीला अटक करून औरंगाबादेत आणले.