शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

शिक्षक नेते शेवटी तालुक्याबाहेर

By admin | Updated: December 12, 2014 00:54 IST

औरंगाबाद : समायोजनातून सूट मिळावी म्हणून मिळेल त्या संघटनेचे पत्र मिळवून रात्रीतून शिक्षक पुढारी झालेल्या ‘त्या’ २२ शिक्षक नेत्यांपैकी १२ जणांना बुधवारी तालुक्याबाहेर जावे लागले

औरंगाबाद : समायोजनातून सूट मिळावी म्हणून मिळेल त्या संघटनेचे पत्र मिळवून रात्रीतून शिक्षक पुढारी झालेल्या ‘त्या’ २२ शिक्षक नेत्यांपैकी १२ जणांना बुधवारी तालुक्याबाहेर जावे लागले. दोन शिक्षक रजेवर असल्याने ते अजूनही तालुक्यात अतिरिक्तच आहेत. २० जणांच्या समायोजनात शिक्षण विभाग दिवसभर व्यस्त होता. नेत्यांची तालुक्याबाहेर जाण्याची मन:स्थितीच नव्हती, शेवटी सीईओंनी दम भरताच नेत्यांनी आदेश स्वीकारले. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १० डिसेंबरपर्यंत समायोजन करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार बुधवारी ही प्रक्रिया राबविण्यात आली. शिक्षक नेते तालुक्याबाहेर जाण्यास तयार नव्हते, त्यामुळे प्रक्रिया दिवसभर रखडली होती. शेवटी प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी या शिक्षक नेत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या समोर उभे केले. आदेश घ्या व उद्या रुजू व्हा, अन्यथा निलंबित करण्याचे फर्मान सीईओंनी सोडताच, नेते लगबगीने निघून गेले. समायोजनातून सूट मिळावी यासाठी शिक्षक संघटनांच्या २२ पदाधिकाऱ्यांनी पत्रे दिली होती. पदाधिकाऱ्यांच्या नावाखाली जिल्ह्यातील इतर तालुक्यांतून कुणालाही सूट देण्यात आलेली नसताना औरंगाबाद तालुक्यात या २२ जणांना सूट मिळाली. त्यामुळे तालुक्यात शिक्षकांची संख्या अतिरिक्त झाली.तालुक्यात शिक्षक अतिरिक्त झालेले असताना अनेक शाळांतून शिक्षक नाहीत. त्यामुळे या शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.