परभणी : लोकशाहीदिनी प्राप्त प्रकरणाबाबत संबंधित विभागांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिले़ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी सिंह होते़ यावेळी पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती़ एस़ पी़ सिंह म्हणाले, सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागाचे काम लोकाभिमुख करण्यावर भर द्यावा, लोकशाहीदिनी प्राप्त प्रकरणात अर्जावर संबंधित विभागांना दिलेल्या सूचना व निेर्देश याबाबत सर्व संबंधित विभागांनी कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले़ सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन, जिल्हाधिकारी, महानगरपालिका, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर राबविण्यात येतो़ तसेच तालुकास्तरावर देखील राबविण्यात येतो़या लोकशाही दिनामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले जात असल्याने समाधान व्यक्त होत आहे़ परंतु, काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काही प्रकरणे प्रलंबित राहत आहेत़ (प्रतिनिधी)अर्ज प्रक्रियेबाबत आवाहनअर्ज स्वीकृतीचे निकष- अर्ज विहित नमुन्यात असावा (नमुना प्ऱप़ १ अ ते १ ड) तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, लोकशाही दिनाकरीता अर्जदारांचे अर्ज विहीत नमुन्यात १५ दिवस आधी आणि दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे़ तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकशाही दिनासाठी अर्ज करावा. ...तर अर्ज स्वीकारले जात नाहीतन्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवा विषयक, अस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यातील नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर वरील प्रमाणे असे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत. असे अर्ज आठ दिवसांत पाठविण्यात यावे, लोकशाही दिनातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची पोचपावती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी दिले़
प्राप्त झालेल्या प्रकरणांवर कारवाई करा
By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST