औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ‘महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळा’ने स्थापन केलेल्या दोन्ही समित्यांनी शैक्षणिक लेखा परीक्षणासाठी तयार केलेल्या प्रारूपाला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, त्यास लवकरच कुलगुरू व व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेतली जाणार आहे.दरम्यान, मे महिन्यापासून संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक विभागांच्या प्रत्यक्ष लेखा परीक्षणाच्या कामकाजाला सुरुवात होईल, असा विश्वास ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे यांनी व्यक्त केला. यासंदर्भात डॉ. काळे म्हणाले की, प्रारूपाचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. या महिन्यात होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर तो मान्यतेसाठी ठेवला जाईल. त्यानंतर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ परिसरातील विभागांच्या लेखा परीक्षणासाठी तज्ज्ञांच्या समित्या गठीत केल्या जातील. ही सर्व कामे युद्धपातळीवर आटोपलीजातील.विद्यापीठ अधिनियमानुसार महाविद्यालये व विद्यापीठातील विभागांचे दर तीन वर्षाला शैक्षणिक लेखा परीक्षण करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक वर्षांपासून ते झाले नव्हते. या वर्षापासून शैक्षणिक लेखा परीक्षण नियमितपणे केले जाणार आहे.‘बीसीयूडी’ने विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि संलग्नित महाविद्यालयांच्या लेखा परीक्षणासाठी ९ जानेवारी रोजी प्रारूप तयार करणाऱ्या दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांनी प्रारूप तयार केले असून, आता त्यास व्यवस्थापन परिषद व कुलगुरूंची मान्यता घेतली जाईल. त्यानंतर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील ३९२ संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठातील ४२ शैक्षणिक विभागांचे प्रत्यक्ष लेखा परीक्षण मे महिन्यापासून केले जाईल. त्यासाठी विद्याशाखानिहाय तज्ज्ञांच्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जाणार आहेत.
‘आॅडिट’साठी यंत्रणा सज्ज
By admin | Updated: April 7, 2015 01:25 IST