शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

साथरोगांची लक्षणे; रुग्णांत झाली वाढ

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

औरंगाबाद - शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ऋतूनुसार पावसाळा लागला आहे; मात्र पावसाने दडी मारलेली असली

औरंगाबाद - शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ऋतूनुसार पावसाळा लागला आहे; मात्र पावसाने दडी मारलेली असली तरी कूलर, डबकी व साठवलेल्या स्वच्छ पाण्यातील डासांची पैदास वाढल्यामुळे तापाचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत. शहानूरवाडी परिसर, रेल्वेगेटजवळील ओमप्रकाश अंबादास मोरे या दोनवर्षीय मुलाला एका खाजगी रुग्णालयात काल ११ रोजी ताप आल्यामुळे दाखल केले आहे. सदरील रुग्णालयाने ओमप्रकाशला डेंग्यू नसल्याचा अहवाल पालिकेला दिला आहे. त्यामुळे त्याला डेंग्यूचे लक्षण नसल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाने केला आहे. मुकुंदवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-५, साईनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपूर, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा या भागात नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मनपाने नालेसफाई तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. डासांमुळे होणारे आजारडासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुन गुनिया हे आजार होतात. अ‍ॅनाप्लेक्स डासामुळे हिवताप येतो. इजिप्टाय हा डास चावल्यास डेंग्यू व चिकुन गुनिया होतो. फ्युलेक्स हा डास चावल्यास हत्तीरोग होतो. पुढच्या आठवड्यात जनजागृतीसाठी मनपा प्रदर्शन भरवून डास, गप्पी माशांचे महत्त्व नागरिकांना पटवून सांगणार आहे. तसेच पावसाळ्यात खबरदारी म्हणून उपाययोजनांची माहितीही देणार आहे, असे मलेरिया विभाग अधिकारी शे. युनूस यांनी सांगितले. नागरिकांनी काळजी घ्यावी...आठवड्यातून एकदा भांडी स्वच्छ धुऊन कोरडी करून गाळून पाणी भरावे. स्वच्छ पाणी झाकून ठेवावे. डासविरोधी साधनांचा वापर करावा. घर स्वच्छ ठेवावे. परिसरात वाढलेले गवत, झुडपे कापून टाकावीत, असे आवाहन मनपाने केले आहे. आजाराची लक्षणेतीव्र ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, सांधे व अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, क्वचित पुरळ येणे ही डेंग्यूची, तर थंडी वाजून येणे, सतत किंवा दिवसाआड ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत.