लातूर : लातूर जिल्ह्यात पुन्हा स्वाईन फ्लूने डोके वर काढले असून, सर्वोपचार रुग्णालयाच्या स्वाईन फ्लू कक्षात एक महिला रुग्ण दाखल झाली आहे. या रुग्णाचा अहवालही स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे.सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास होत असल्याने सर्वोपचार रुग्णालयात ही महिला दाखल झाली असून, या महिलेवर मागील तीन दिवसांपासून उपचार करण्यात येत आहेत. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्वाईन फ्लू विभाग प्रमुख डॉ़ आऱ टी़ भराटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले !
By admin | Updated: August 23, 2015 23:47 IST