शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सीताफळाची गोडी महाग !

By admin | Updated: December 14, 2015 23:57 IST

राजेश खराडे , बीड पौष्टिकतेच्या सर्व गुण संपन्नतेमुळे जिल्ह्यातील सीताफळाची ओळख संपूर्ण राज्यात झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचे भौगोलिक चिन्हांकन म्हणून सीताफळाला

राजेश खराडे , बीडपौष्टिकतेच्या सर्व गुण संपन्नतेमुळे जिल्ह्यातील सीताफळाची ओळख संपूर्ण राज्यात झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचे भौगोलिक चिन्हांकन म्हणून सीताफळाला प्राधान्यक्रम देत तसा प्रस्तावही शासनदरबारी धाडला. मात्र, दुसरीकडे अल्प पर्जन्यमानामुळे सीताफळ उत्पादन गोत्यात आले आहे. यंदा उत्पादनात सुमारे ७५ टक्के घट झाल्याने सीताफळाची गोडी महाग होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.जिल्ह्यात ५५० हेक्टरवर सीताफळाची लागवड आहे. डोंगराळ भाग अधिक असलेल्या धारूर, केज परिसरात सिताफळांची लागवड अधिक प्रमाणात झाली आहे . सिताफळाला आवश्यक असलेला ५५० ते ६५० मिमी पाऊसाची सरासरी जिल्ह्यात आहे. शिवाय कोरड्या व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे सिताफळाच्या पौष्टिकतेमध्ये भर पडते. त्यामुळे त्याची चव चाखण्यासाठी नगर, पुणे येथील व्यापारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या दारी येऊन मालाची खरेदी करतात. यंदा पर्जन्यमान निम्म्यावरच झाले आहे. त्यामुळे फळाची योग्य वाढ न झाल्याने त्याच्या पौष्टिकतेवरही परिणाम झाला आहे. केज तालुक्यात सुमारे २२५ हेक्टरमध्ये सिताफळाची लागवड करण्यात आली असून डोंगरमाथ्यावरील परिसरात सिताफळाचे अधिकचे क्षेत्र आहे. उन्हाळ्यात सिताफळांच्या झाडांची पाने गळतात व जून ते सप्टेंबर या फळधारणेच्या कालावधीतीच होणाऱ्या पावसामुळे सिताफळाच्या पौष्टिकतेमध्ये वाढ होते. बालानगर, टिपीसात, आर्द्रासहान वाणाचे सिताफळ जिल्ह्यात आढळून येतात. सिताफळाच्या या विविधतेमुळे भौगोलिक चिन्हांकरिता प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. केज बरोबर धारूर येथे ७० बीड तालुक्यात १११ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.