शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुराज्याचे स्वप्न राजमाता जिजाऊंचे

By admin | Updated: January 17, 2016 00:04 IST

औरंगाबाद : सुराज्याचे स्वप्न हे राजमाता जिजाऊंचे होते आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर बारा वर्षांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

औरंगाबाद : सुराज्याचे स्वप्न हे राजमाता जिजाऊंचे होते आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर बारा वर्षांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला, असे प्रतिपादन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमात केले. युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले युवा मंचतर्फे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव २०१६ निमित्त ख्यातनाम वक्ते प्रदीपदादा सोळुंके यांचे रामनगरातील सुशीलादेवी देशमुख विद्यालयात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आ. सतीश चव्हाण होते. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, तर स्वागताध्यक्षा म्हणून जिल्हा परिषद सदस्य अनुराधाताई चव्हाण होत्या. यावेळी मुंडे म्हणाले की, जिजाऊंनी आयुष्यभर सुराज्याचाच विचार केला. शिवाजीराजेंचा स्वराज्याभिषेक झाल्यानंतर बारा वर्षांनी त्यांनी जगाचा निरोप घेतला. जिजाऊंनी शिवाजीराजांना जे धडे दिले त्यामुळेच शिवाजी महाराज हे समतेचे आणि सहिष्णुतेचे खरे उदाहरण ठरले. आपल्या मुलाबाळांच्या हितासाठी जिजाऊंएवढाच कणखरपणा प्रत्येक माता-भगिनीने निर्माण केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या व्याख्यानात प्रदीप सोळुंके यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले हे त्यांचे मोठेपण आहेच; परंतु विविध जाती-धर्मांच्या अठरापगड लोकांची मने जिंकली हे त्यांचे मोठे कर्तृत्व आहे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना महिलांचा सन्मान राखायला शिकविले आणि त्यामुळेच महाराजांनी महिलांवर अन्याय करणाऱ्यांना जबर शिक्षा दिल्या. यावेळी अनुराधाताई चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, महिला आघाडीच्या अध्यक्षा मेहराज पटेल, माणिकराव शिंदे यांच्यासह कार्यक्रमाचे आयोजक अक्षय सोळुंके, अमोल रंधे, भागवत गाठाळ, अंकिता विधाते, पंकजनाना देशमुख, अजय चिकटगावकर, भाग्यश्री राजपूत आदींची उपस्थिती होती. यावेळी शाहीर समाधान इंगळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम झाला.