शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. शिपायाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:08 IST

केळगाव येथील ग्रामपंचायतीचे शिपाई विठ्ठल पांडू वाघ यांचा संशयास्पद मृत्यू झाला

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : तालुक्यातील केळगाव येथील ग्रामपंचायतीचे शिपाई विठ्ठल पांडू वाघ यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांनी संगनमत करून बेदम मारहाण करून त्यांचा खून केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.जोपर्यंत या सर्वांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा मयताचा मुलगा, मुलगी, पत्नी व नातेवाईकांनी घेतल्याने रविवारी येथे तणाव निर्माण झाला होता.आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करणार नाही, असे म्हणत त्यांनी सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काही वेळ मृतदेह ठेवून ठिय्या मांडला होता.पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याने वाघ यांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. चौकशी सुरु आहे. आम्हाला आमचे काम करू द्या, असे म्हणत प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली.मयताची पत्नी व मुलीचा म्हणण्यानुसार, विठ्ठल वाघ यांचे काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच व इतर लोकांशी वाद झाला होता. हा वाद आपण गावकºयांसमोर बसून मिटवून घेऊ असे म्हणत सरपंच सोमीनाथ नारायण कोल्हे, उपसरपंच संतोष दगडू जाधव, पोलीस पाटील बाळू हरी इवरे, संदीप सर्जेराव पवार, गजानन मुळे, किशोर शिंदे, आदींनी ग्रामपंचायतीत बोलावून वाद मिटविण्याऐवजी वाघ यांना जातीवाचक शिविगाळ केली. यामुळे आम्ही १ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी काहीच कारवाई न केल्याने या सर्व लोकांनी संगनमत करुन शनिवारी वाघ यांना तुम्हाला पार्टी देतो, असे म्हणून बाहेर घेऊन गेले व त्यांना मारहाण करुन खून करून त्यांचे प्रेत भल्या पहाटे घरी आणून टाकले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन साबळे, सीताराम कांबळे, प्रा. अनिल साबळे, सतीश शेलार, सखाराम आहिरे, अशोक कांबळे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी सिल्लोड ग्रामीणचे सपोनि. पाटील यांची भेट घेऊन संबंधित आरोपींवर खून व इतर गुन्हे दाखल झाल्याशिवाय अंत्यसंस्कार करायचे नाही, असे सांगितले. पोलिस ठाणे परिसरात मोठ्या संख्येने समाजाचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.