शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

चार शिक्षकांवर निलंबनाची संक्रात

By admin | Updated: January 13, 2017 00:39 IST

उस्मानाबाद : उस्मानाबाद : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेदरम्यान कळंब येथील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून केंद्र चालकाचा निषेध करणे बाळकृष्ण तांबारे यांच्या अंगाशी आले आहे.

उस्मानाबाद : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेदरम्यान कळंब येथील परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून केंद्र चालकाचा निषेध करणे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या चांगलेच अंगाशी आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांच्याविरूद्ध जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. याबरोबरच आंतरजिल्हा बदलीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याचा ठपका ठेवित तीन गुरूजींचे ‘सस्पेन्शन’ केले आहे. या कारवाईमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ८ जानेवारी रोजी झाली. कळंब तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी तीन केंद्रांचे नियोजन करण्यात आले होते. यापैैकी एका परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्णा तांबारे यांच्यासह काही गुरूजींनी ‘ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षकांना पर्यवेक्षणाची जबाबदारी दिली जात नाही’, असा आरोप करीत केंद्राच्या प्रवेशद्वारात ठिय्या मांडला. या प्रकरणी नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशावरून सीईओ आनंद रायते यांनी तांबारे यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात आंतरजिल्हा बदलीसाठी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर बेकायदेशीररित्या आंदोलन केल्याचा ठपका ठेवित आनाळा जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक संतोष नारायण कापसे यांच्यासह अन्य दोघांविरूद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. संबंधित शिक्षकांच्या विनंतीनुसार उस्मानाबाद जि.प.ने सोलापूर जिल्हा परिषदेकडे त्यांचे संमतीपत्र सादर केले असतानाही आंदोलन करून प्रशासकीय कामात अडथळा आणला, असे संबंधित गुरूजींच्या निलंबन आदेशात म्हटले आहे. दरम्यान, अन्य दोन शिक्षकांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.(प्रतिनिधी)