शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीचे उपअभियंता तरकसे निलंबित

By admin | Updated: March 18, 2016 00:07 IST

परभणी : पाथरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता जी.डी.तरकसे यांना प्रत्यक्ष कामे न करताच बिले उचलल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले

परभणी : पाथरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता जी.डी.तरकसे यांना प्रत्यक्ष कामे न करताच बिले उचलल्या प्रकरणी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती आ.बाबाजानी दुर्राणी यांनी दिली.या संदर्भात माहिती देताना आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, पाथरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन प्रभारी उपअभियंता जी.डी. तरकसे यांनी २०१४-१५ मध्ये जवळपास १६० रस्ता दुरुस्तीची तसेच इमारत दुरुस्तीची कामे न करता त्यांचे कागदोपत्री रेकॉर्ड तयार केले व कोट्यावधी रुपयांची बिले उचलून अपहार केला. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औरंगाबाद येथील दक्षता व गुणनियंत्रण मंडळाकडे तक्रार करण्यात आली. तसेच नांदेड येथील सा.बां विभागाच्या अधीक्षक अभियंत्याकडेही तक्रार करण्यात आली. रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांची घरी बसूनच अंदाजपत्रके करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील मग्रारोहयो विभागाच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे पत्र अधीक्षक अभियंत्यांना दिले होते. या प्रकरणी कारवाई झाली नाही. त्याबद्दल आ.दुर्राणी यांनी विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी मांडली. ही लक्षवेधी गुरुवारी सभागृहात चर्चेला आली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपअभियंता तरकसे यांना निलंबित करण्यात आले असल्याची घोषणा केली असल्याचे आ.दुर्राणी म्हणाले.पाथरी- सोनपेठ रस्त्याची बोगस कामे करण्यात आल्यामुळे सोनपेठकरांना उपोषण करावे लागले, असेही आ.दुर्राणी म्हणाले. (प्रतिनिधी)