लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेतील चार निलंबित अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागीय चौकशी अधिकारी डी. ए. वानखेडे यांच्याकडे शहर अभियंता सखाराम पानझडे, प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे, नगररचना सहसंचालक डी. पी. कुलकर्णी, मुख्य अग्निशमन अधिकारी (निवृत्त) शिवाजी झनझन यांची विभागीय चौकशी सोपविण्यात आली आहे. यासाठी लागणारी सर्व कागदपत्रेही महापालिकेने जमा केली आहेत. विभागीय चौकशी सुरू करण्यासाठी सादरकर्ते अधिकारीही नेमण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी दिली.महापालिकेतील उच्च पदस्थ अधिकारी मागील वर्षी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये निलंबित आहेत. तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ही कारवाई केली होती. निलंबित अधिकाºयांची सहा महिन्यांत चौकशी करणे हा शासन नियम आहे. काही प्रकरणांमध्ये चौकशीच्या अधीन राहूनही परत सेवेत घेण्यात येते. मनपातील या चारही निलंबित अधिकाºयांचा निर्णय स्वत: आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी आपल्या स्तरावर घ्यावा, असेही नुकतेच कळविले. शासनाने निलंबित अधिकाºयांचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात टाकताच आयुक्त मुगळीकर यांनी विभागीय चौकशीला सुरुवात केली. सहा महिन्यांत ही चौकशी पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण कधी निर्णय घेणार यावर स्मितहास्य करीत त्यांनी योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.शहर अभियंता पानझडे यांना हर्सूल तलावातील गाळ प्रकरणात, नगररचना सहसंचालक कुलकर्णी यांना टी.डी.आर घोटाळ्यात, मुख्य अग्नीशमन अधिकारी (निवृत्त) झनझन यांना औरंगपुरा येथील फटाका मार्केटला आग लागल्याप्रकरणी, प्राणीसंग्रहालय संचालक नाईकवाडे यांना रेणू या वाघीनीचे पिल्ले मरण पावल्याने निलंबीत करण्यात आले होते. सर्व अधिकाºयांना परत सेवेत येण्याचे वेध लागले आहेत.
निलंबित अधिकाºयांची विभागीय चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:18 IST