शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागातील लिपिक निलंबित

By admin | Updated: June 22, 2016 00:56 IST

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी उशिरा रात्री शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना मोबाईलवर असंवैधानिक भाषेत बोलणाऱ्या कनिष्ठ लिपिकास

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी उशिरा रात्री शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांना मोबाईलवर असंवैधानिक भाषेत बोलणाऱ्या कनिष्ठ लिपिकास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निलंबित केले आहे. निलंबित झालेले कनिष्ठ सहायक पी. बी. चोबे हे दोन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार आहेत, हे विशेष!झाले असे की, शिक्षण विभागातील जि.प. माध्यमिक शिक्षकांच्या आस्थापनेचे काम चोबे यांच्याकडे आहे. मागील महिन्यात रात्री ११ वाजेच्या नंतर चोबे यांनी शिक्षणाधिकारी मोगल यांना मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांनी मोबाईलवर अश्लील भाषेत मोगल यांच्याशी बातचित केली. ही बाब मोगल यांना खटकली. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांच्याकडे चोबे यांच्या वर्तनाबद्दल तक्रार केली. मोगल यांच्या मोबाईलमधील चोबे यांच्या संवादाचे रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरीही संतप्त झाले. त्यांनी महाराष्ट्र जि.प. अधिनियमातील सेवाशर्तीतील वर्तणूक नियम ३ चा भंग केल्यामुळे चोबे यांना तडकाफडकी निलंबित केले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी पकडलेल्या समाजकल्याण विभागातील दोघे कर्मचारी व आरोग्य विभागातील एक कर्मचारी लवकरच निलंबित केले जातील. त्यांचा अहवाल प्राप्त झालेला आहे.दुसरीकडे, समाजकल्याण अधिकारी पदावर लवकरच डॉ. सचिन मडावी रुजू होतील, असेही ते म्हणाले. यापूर्वीही मडावी हे प्रभारी समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यरत होते; मात्र विद्यमान समाजकल्याण सभापती यांच्या पतीसोबत शाब्दिक खटके उडाल्यामुळे समाजकल्याण आयुक्तांनी समाधान इंगळे यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवली होती. समाधान इंगळे हे लाच प्रकरणात आरोपी असल्यामुळे पुन्हा सचिन मडावी यांच्याकडे समाजकल्याण अधिकाऱ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ४नुकत्याच जिल्हा आणि तालुकास्तरावरून शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. १५ जूनपासून शाळा सुरू झाल्या असून आणखी काही शिक्षक हे बदली झालेल्या शाळांवर रुजू झालेले नाहीत. यासंबंधीचा अहवाल ‘सीईओं’नी मागविलेला आहे. जे शिक्षक बदली झाल्यानंतर पदस्थापना दिलेल्या शाळांवर रुजू झालेले नसतील, त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. यापूर्वीही अनेक शिक्षकांनी बदली झाल्यानंतरही संबंधित शाळांवर रुजू न होता सहा-सहा महिन्यांचे वेतन उचलले आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे ‘सीईओं’नी बदली झालेले शिक्षक, बदलीनंतर संबंधित शाळेवर रुजू झालेले शिक्षक आणि अद्यापही पदस्थापना दिलेल्या शाळांवर रुजू न झालेल्या शिक्षकांचा अहवाल शिक्षणाधिका-ऱ्यांकडून मागविलेला आहे.